शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गवतापासून बनलेला 600 वर्षांपूर्वीचा पूल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 5:07 PM

1 / 8
गवतापासून बनलेल्या या पूलास इंका रोप ब्रीज असे म्हटले जाते. कारण, इंका साम्राज्यात पूल बांधण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता.
2 / 8
येथील परंपरेनुसार केवळ पुरुषांनाच हा पूल बनविण्याचा अधिकार होता. महिला केवळ नदीकिनारी बसून लहान-लहान दोऱ्या बनवित.
3 / 8
जाड दोरखंडाचा वापर करुन हवेत लटकणाऱ्या या पुलास हातांनीच गुंफले जाते. विशेष म्हणजे गेल्या 600 वर्षांपासून हा पूल लोकांच्या वाहतूकीचे साधन बनला आहे.
4 / 8
युनेस्कोने 2013 मध्ये यास जागतिक मान्यतेच्या रुपात घोषित केले आहे. या पुलाच्या बांधणीवरुन नवीन पुलांची निर्मित्ती करण्यात येत आहे.
5 / 8
पूलबांधणीचा हा दोरखंड बनविण्याची पद्धतही जबरदस्त आहे. पुलाच्या दोन्ही बाजुंचे पुरुष कारागिर एकत्र येऊन गवतापासून हा दोरखंड बनवतात.
6 / 8
पूल बनिवण्याच्या पहिल्याच दिवशी कामावर येणारे पुरुष लहान दोऱ्यांच्या सहाय्याने मोठा दोरखंड बनवित. प्रमुक पूल हा 6 मोठ्या दोरखंडांपासून बनविला जातो.
7 / 8
हा पूल बनिवण्यासाठी कोया इचू नामक विशिष्ट वनस्पतीचे गवत वापरण्यात येते. त्यास अगोदर दगडांनी ठेचून आणि नंतर पाण्यात भिजवून घेतले जाते. आपण, त्यास काथ्या असंही म्हणतो.
8 / 8
विशेष म्हणजे हा पूल बनिवण्यासाठी कुठल्याही आधुनिक यंत्रसामुग्राची किंवा मशिनचा वापर करण्यात आला नाही.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके