शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इथे कुणीच खाली पडत नाहीत, पृथ्वीवरची 7 'चमत्कारी' ठिकाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 3:16 PM

1 / 7
1) मिस्ट्री स्पॉट, सांताक्रूझ, कॅलिफोर्निया - ही जागा कोणत्याही रहस्यमयी जागेपेक्षा कमी नाहीये. इथे तुम्हाला असंकाही अनुभवायला मिळेल जे तुम्ही कधीही अनुभवलं नसेल. इथे तुम्ही पाणी वरच्या दिशेने वाहत असल्याचे तुम्हाला बघायला मिळेल. तसेच येथील झाडेही तुम्हाला एकाच दिशेने वाढताना दिसतील.
2 / 7
2) कॉस्मोज मिस्ट्री एरिया, रॅपिड सिटी, साऊथ डकोता - एका वेबसाईटने माहिती दिली आहे की, या जागेवर तुम्हाला रहस्य, कॉमेडी आणि विज्ञान यांचं मिश्रण बघायला मिळेल.
3 / 7
3) सेंट इग्नेस मिस्ट्री स्पेस, मिशिगन - 1950 मध्ये केल्या गेलेल्या एका सर्व्हेनुसार, या जागेच्या 300 मीटरच्या परीसरात कोणतीही मशीन योग्य प्रकारे काम करत नाही. मात्र या 300 मीटरच्या परीसराबाहेत प्रत्येक वस्तू व्यवस्थित काम करते.
4 / 7
4) अॅरगन वरटोक्स, गोल्ड हिल, अॅरिगन - 1930 च्या दशकापासूनच ही जागा पर्यटकांसाठी आकर्षण राहिली आहे. पण येथील एक खास जागा सर्वांनाच अचंबित करते ती म्हणजे या जागेवर उभे राहून लांबीमध्ये फरक जाणवतो. जसजसे तुम्ही जागा बदलाल तसतशी तुम्हाला लांबी वाढताना आणि जास्त होताना दिसेल.
5 / 7
5) मॅग्नेटिक हिल, लदाख - लदाख आपल्या उंचच उंच डोंगरांसाठी प्रसिद्ध आहे. त्यासोबतच आणखी येथे अशीही जागा आहे जिथे गाडी चालवताना गाडी स्वत:हूनच वरच्या दिशेने धावू लागते.
6 / 7
6) मॅग्नेटिक हिल, ब्लॅक रॉक, ऑस्ट्रेलिया- ही जागाही लदाखच्या मॅग्नेटिक हिलसारखी आहे. इथेही गाडी चावताना गाडी वरच्या दिशेने पळायला लागते.
7 / 7
7) हूंवर डॅम, नवादा, अमेरिका - अमेरिकेतील हूंवर डॅम नवादाचंही फारच वेगळं काम आहे. येथील डॅमवरुन पाणी तुम्ही खाली फेकल्यास ते उलट वरच्या दिशेने वाहतं.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके