7 things employees of Google, Microsoft, Amazon are 'banned' from doing at work
गुगल, मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमधले 'हे' अजब नियम माहितीयेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 2:37 PM1 / 8गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पगाराचं पॅकेज देतात. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वेगवेगळ्या सुविधा या त्यांना ऑफिसमध्ये देण्यात येतात. मात्र या कंपन्यांमध्ये काही अजब नियम आहेत. ते जाणून घेऊया. 2 / 8अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांनी एका मुलाखतीत अॅमेझॉनमध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करण्यास मनाई असल्याचं सांगितलं. 3 / 8मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना काम करत असताना शब्द, व्याकरण तपासणाऱ्या अॅपचा वापर करण्यास बंदी आहे.4 / 8गुगलमध्ये कामाव्यतिरिक्त गोष्टींवर चर्चा करण्यास मनाई आहे. कर्मचारी काम करण्यासाठी ऑफिसमध्ये येत असल्याने हा नियम लागू केला आहे. 5 / 8आयबीएम कंपनीमध्ये एसडी कार्ड, पेन ड्राइव्ह वापरण्यास बंदी आहे. 2018 मध्ये आयबीएमने याची माहिती दिली होती.6 / 8उबरच्या सीईओंनी उबरमध्ये टेलिग्राम अॅप वापरण्यास मनाई असल्याची माहिती दिली होती.7 / 8टेस्ला कंपनीने कर्मचाऱ्यांना ब्लाइंड अॅप वापरण्यास बंदी घातली आहे. अॅपच्या माध्यमातून कर्मचारी कंपनीबाबत चर्चा करत असल्यामुळे ही बंदी घालण्यात आली.8 / 8मायक्रोसॉफ्टमध्ये गुगल डॉक्स वापरण्याला बंदी आहे, खरंतर थेट बंदी नाही मात्र हे वापरल्यास त्याबाबतच व्यावसायिक कारण देऊन स्पष्टीकरण द्यावं लागतं. आणखी वाचा Subscribe to Notifications