9 bizarre reasons for considering divorce in India
घटस्फोटाची 'ही' एकापेक्षा एक विचित्र कारणे वाचून कन्फ्यूजही व्हाल अन् चक्रावूनही जाल! By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 1:20 PM1 / 10आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी लोक लग्न करतात. पण अनेकदा हे सुंदर नातं काही कारणांमुळे नकोसं होतं. अशात लोक घटस्फोट घेऊन स्वतंत्र होतात. घटस्फोट ही तशी तर काही आनंदाची बाब नाही. पण कधी कधी आयुष्यात आनंद कायम ठेवण्यासाठी हे करणं गरजेचं असतं. मात्र, कधी कधी घटस्फोट घेण्याची कारणे फारच विचित्र असतात. काही कारणांवर तर विश्वासही बसत नाही. अशीच काही कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.2 / 10- पतीला टक्कल पडलं म्हणून - ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या मेरठमधील. इथे एक महिला तिच्या टक्कल असलेल्या महिलेपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात पोहोचली. महिलेचा दावा आहे की तिला याबाबत अंधारात ठेवण्यात आलं होतं. लग्नावेळी पतीचे दाट केस होते. नंतर समजले की तो विग घालत होता. 3 / 10 - पत्नी जास्त पार्टी करत होती - मुंबईतील एका व्यक्तीने याकारणाने घटस्फोट मागितला होता कारण त्याची पत्नी जास्त पार्ट्या करत होती. मात्र, बॉम्बे हार्यकोर्टाने फॅमिली हायकोर्टाचा निर्णय बदलत घटस्फोट देण्यास नकार दिला होता. कारण कोर्टाने पत्नीच्या पार्टी करण्याला पतीसोबत हिंसा मानण्यास नकार दिला.4 / 10- पतीने सोडली बीअर म्हणून..- मध्य प्रदेशच्या भोपाळमधील ही घटना आहे. इथे पती आणि पत्नी दर दुसऱ्या दिवशी बीअर घेत होते. पण एक दिवस पतीने बीअर सोडण्याचा निर्णय घेतला. पत्नी खूप समजावलं तरी पती बीअर पिण्यास तयार नव्हता. त्यामुळे नाजार झालेल्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज टाकला.5 / 10- प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक संबंध - वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधाची कमतरता हे घटस्फोटाचं कारण असू शकतं. पण जास्त शारीरिक संबंधाची मागणी हे फार ऐकायला मिळत नाही. मुंबईत एका पतीसोबत असंच झालं. त्याने सांगितले की, त्याची पत्नी जास्त शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडते. तो म्हणाला की, तो आजारी असला तरी ती त्याला कसं करायला सांगते. इतकंच नाही तर ती दुसऱ्या पुरूषांकडे जाईन अशी धमकीही देत होती. याचा आधारावर कोर्टाने पतीला घटस्फोट मंजूर केलाय.6 / 10- १०-१० दिवस पती करत नाही आंघोळ - बिहारमधील एक महिला तिच्या पतीच्या १०-१० दिवस आंघोळ न करण्याने हैराण झाली होती. याच कारणाने तिने घटस्फोटासाठी अर्जही केली. महिला सांगत होती की, तो आंघोळ करत नसल्याने त्याच्या शरीराची दुर्गंधी येते. 7 / 10- पतीच्या पाया पडायचे नव्हते - अनेकदा काही लोकांना समाजातील प्रथा मान्य नसतात. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं होतं. तिला करवा चौथला पतीच्या पाया पडायची प्रथा आवडली नाही. यापेक्षा तिने वेगळं होणं जास्त पसंत केलं.8 / 10- पतीच्या अति प्रेमाने हैराण - उत्तर प्रदेशच्या संभल जिल्हयातील एका महिलेने घटस्फोटाची मागणी केली कारण तिचा पती तिच्यावर खूप जास्त प्रेम करतो. महिलेने लग्नाच्या १८ महिन्यांनंतर घटस्फोटासाठी मागणी केली. महिलेने सांगितले की, इतक्या प्रेमाने तिला गुदमरल्यासारखं वाटत आहे. मात्र, शरिया कोर्टाने तिचा अर्ज फेटाळला होता. नंतर महिलेने हे प्रकरण पंचायतमध्ये नेलं होतं.9 / 10- पत्नीच्या चेहऱ्यावर पिंपल्स - एका व्यक्तीने घटस्फोटाचं कारण दिलं होतं की, त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर पिंपल्स असल्याने १९९८ मध्ये त्याला हनीमूनवेळी शारीरिक संबंध ठेवता आले नव्हते. तो म्हणाला की, पत्नीने तिच्या स्कीन डिजीजबाबत सांगितलंच नव्हतं. याचा निर्णय पतीच्या बाजूने लागला होता. पण बॉम्बे कोर्टाने मंजूरी दिली नव्हती.10 / 10- पत्नी पॅंट-शर्ट घालते म्हणून - मुंबईत एका व्यक्तीने पत्नीच्या कपड्यांवरून क्रूरतेचा आरोप करत घटस्फोट मागितला होता. तो म्हणाला होता की, पत्नी नोकरीला पॅट-शर्ट घालून जाते. बॉम्बे हायकोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications