शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक असं अंडरग्राउंड शहर ज्यात राहत होते २० हजार लोक, सापडलं कसं वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 2:29 PM

1 / 9
Derinkuyu story : जगात अशा अनेक गोष्टी आहे जे बघून विश्वासच बसत नाही किंवा या गोष्टींची रचना कशी केली असेल? असे प्रश्न पडतात. अशाच एका वास्तूबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे एक जगातील सगळ्यात मोठ्या अंडरग्राउंड शहरांपैकी एक आहे. या शहरात २०० पेक्षा जास्त समूहाचे २० हजारांपेक्षा जास्त लोक राहत होते.
2 / 9
हे शहर तुर्कीच्या कप्पाडोसियामध्ये असून १९६३ मध्ये जगासमोर आलं होतं. हे शहर सापडण्याची कहाणी सुद्धा फारच इंटरेस्टींग आहे. एका कोंबडीमुळे हे जमिनीखाली दडलेलं शहर समोर आलं होतं.
3 / 9
या अंडरग्राउंड शहराचं नाव डेरिनकुयु आहे. शहराच्या आत चर्च, बाथरूम-स्मशानभूमी आणि पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी आहेत. शहराची खोली जवळपास २०० फूट आहे. हजारो वर्षाआधी तुर्क शासनाच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी लोकांनी ही भुयारी घरे तयार केली होती, असं सांगितलं जातं.
4 / 9
हे शहर हजारो वर्ष जुनं असून आजही सुस्थितीत आहे. उंच उंच इमारतींसारखी आत घरे तयार केली होती. त्यांनी यात पायऱ्याही बांधल्या होत्या. प्रवेश द्वारावर दगडांचे मोठे दरवाजे होते. जे दीड मीटर लांब आणि २०० ते ५०० किलो वजनाचे होते.
5 / 9
न्‍यूयॉर्क पोस्‍टच्या एका रिपोर्टनुसार, एका व्यक्तीच्या कोंबड्या अचानक गायब होऊ लागल्या होत्या. त्याने शोधाशोध केली तर घराच्या तळघरात त्याला काही गॅप दिसून आले. त्याने भींत तोडली आणि जे समोर दिसलं ते पाहून अवाक् झाला. त्याला हे शहर दिसलं.
6 / 9
नंतर खोदकाम झालं तेव्हा समजलं की, तिथे ६०० पेक्षा जास्त भुयार आहेत. यात अंडरग्राउंड घरे, गोदाम, गोठे, शाळा, वायनरी अशी ठिकाणे दिसली. जे बघून जगभरातील इतिहासकार हैराण झाले. १९८५ मध्ये डेरिंक्यूला यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज घोषित केलं.
7 / 9
फ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर एंड्रिया डि जियोर्गी यांनी सांगितलं की, कप्पाडोसियाच्या मातीमध्ये पाण्याची कमतरता होती. ज्यामुळे डोंगर सहजपणे पडत होते. त्यामुळे इथूनच भूमिगत घरे बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी.
8 / 9
पण डेरिंक्यू कुणी बनवलं आणि याचं श्रेय कुणाला द्यावं याचं उत्तर आजपर्यंत सापडलेलं नाही. जियोर्गीनुसार, हे शहर फ़्रीजियंसकडून डिझाइन केलं असू शकतं. त्या म्हणाल्या की, अनातोलियामध्ये फ़्रीजियन सगळ्यात महत्वाच्या साम्राज्यांपैकी एक होतं.
9 / 9
त्यांच्याकडे डोंगरांमध्ये स्मारक बनवण्याचं कौशल्य होतं. Derinque चा वापर भांडारासाठी केला जात होता. पण जेव्हा परदेशी आक्रमणे वाढली तेव्हा स्थानिक लोकांनी इथे राहणं सुरू केलं. नंतर शहराची लोकसंख्या २० हजारांवर गेली.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके