शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नासाठी 'या' देशात भरवतात मुलींचा बाजार; पुरुष पैसे देऊन 'नवरी' खरेदी करतात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 7:07 PM

1 / 10
आतापर्यंत तुम्ही मार्केटमध्ये कपडे, भाज्या, बुटे किंवा अन्य गोष्टींची विक्री होताना पाहिले असेल. परंतु नवरी विकत मिळते हे पाहिलंय का? ऐकून तुम्ही हैराण व्हाल परंतु जगातील एक देश असा आहे जिथे ही अनोखी जागा आहे.
2 / 10
लग्नाचे बंधन आपल्या देशात पवित्र मानलं जाते. परंतु या देशात महिलांची कांदे-बटाटेसारख्या विक्री केल्या जातात. बुल्गारियामध्ये अशी जागा आहे. जिथे नवरीला विकले जाते. पुरुषही या महिलांना खरेदी करून त्यांची पत्नी बनवतात.
3 / 10
बुल्गारिया येथे एक मंडी लागते. जिथे नवरी विकत मिळते. या जागेला स्तारा जागोर म्हटलं जाते. जिथे पुरुष मुलींना विकत घेऊन त्यांची नवरी बनवून घेऊन जातात. इतकेच नाही पुरुष त्यांच्या कुटुंबासह इथे येतात आणि मुलींची निवड करून घेऊन जातात.
4 / 10
जी मुलगी मुलाला पसंत करते, त्यानंतर तिचा भाव ठरला जातो. जेव्हा मुलीच्या घरचे खरेदीच्या किंमतीने खुश होतात तेव्हा त्या किंमतीत मुलीला मुलांच्या घरी दिले जाते. मग मुलगा मुलीला घरी घेऊन जातो. त्यानंतर मुलीला पत्नीचा दर्जा मिळतो.
5 / 10
नवरीमुलींचा हा बाजार गरीब मुलींसाठी लावला जातो. ज्या घरचे मुलीचे लग्न खर्चामुळे करू शकत नाहीत तिला बाजारात आणून विकले जाते. मुलींच्या या बाजारातून मुलगा मुलीची निवड करतो. मुलीलाही मुलगा पसंत असेल तर पुढील भाव ठरवला जातो.
6 / 10
ही ऐकायला विचित्र वाटत असलं तरी बुल्गारिया इथं गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा सुरू आहे. इतकेच नाही तर सरकारकडूनही हा बाजार लावण्यासाठी परवानगी दिली जाते. या बाजारात मुलींच्या किंमती वेगवेगळ्या दराने ठरवल्या जातात.
7 / 10
या प्रथेत मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी अनेक नियम आहेत. मुलगी अविवाहित असायला हवी तेव्हाच त्या मुलीला जास्त किंमत दिली जाते. मार्केटमध्ये कलाइदझी समाजाचे लोक त्यांच्या मुलींना घेऊन या मार्केटमध्ये विक्रीला आणतात.
8 / 10
त्याचसोबत मार्केटमध्ये विक्रीला आणलेल्या मुली या गरीब असायला हव्यात. जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्या मुलींना बाजारात विकण्यास मनाई आहे. विक्री केल्यानंतर खरेदी केलेल्या मुलीला मुलाच्या घरच्यांकडून सूनेचा दर्जा देणे आवश्यक आहे.
9 / 10
लग्नासाठी मुलींची विक्री करणे हा प्रकार संतापजनक असला तरी बुल्गारिया इथं लग्नासाठी मुलींना विकले जाते. दरवर्षी मुलींच्या विक्रीसाठी ४ वेळा बाजार भरला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी युवतींना विकण्यासाठी ठेवले जाते त्यांचे आई वडीलही आनंदी असतात.
10 / 10
बुल्गारिया हा युरोपीय संघाचा भाग आहे. याठिकाणी बाजारात ३०० ते ४०० डॉलरपर्यंत मुलींची विक्री केली जाते. याठिकाणी युवतींचे कॉलेजपर्यंतही शिक्षण होत नाही. समाजात मागासलेले पण आहे जे मुलींनी शिक्षणापासून वंचित ठेवते. ज्या युवतींनी विकले जाते त्यातील बहुतांश युवती या अल्पवयीनच असतात.