Aadhaar Card Alert How To Check My Aadhar Card History Online Utility News
तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय का? अशाप्रकारे तपासा मोबाईलवरून हिस्ट्री By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 4:21 PM1 / 7नवी दिल्ली : सरकारी काम करायचं असो वा निमसरकारी काम, त्यासाठी अनेक प्रकारच्या कागदपत्रांची गरज असते. जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, बँकिंग माहिती इत्यादी. पण असे एक कागदपत्र आहे, जे गहाळ झाल्यास किंवा जवळ नसल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि ते कागदपत्र म्हणजे आपले आधार कार्ड.2 / 7आधार कार्ड हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला जारी केले जाते, ज्याचा 12 अंकी आयडी असतो. मात्र, आधार कार्डची गरज मोठी असल्याने फसवणूक करणारेही चांगलेच सक्रिय झाले आहेत, जे लोकांच्या आधार कार्डचा गैरवापर करण्यापासून मागे हटत नाहीत.3 / 7अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हे देखील जाणून घ्यायचे असेल की तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे, तर तुम्ही त्याचा इतिहास जाणून घेऊ शकता. चला तर मग आम्ही तुम्हाला इतिहास तपासण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या...4 / 7वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला 'माय आधार' हा ऑप्शन दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 'Aadhaar Authentication History' हा ऑप्शन दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.5 / 7त्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड देखील भरा. आता ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा.6 / 7आता तुम्हाला त्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी मिळेल, जो तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे. हा ओटीपी देखील इथे टाका.7 / 7शेवटी तुमच्या समोर एक टॅब उघडेल. येथे तुम्हाला ती तारीख टाकावी लागेल, ज्या दिवशीचा तुम्हाला इतिहास पहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की, तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे. तुम्ही हे रेकॉर्ड डाउनलोड देखील करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications