शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

क्या बात! १० वर्ष मुलगा बनून तालिबानला मूर्ख बनवत राहिली मुलगी, उद्देश पूर्ण होताच सोडला देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 3:23 PM

1 / 7
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पुन्हा ताबा मिळवल्यावर महिलांवरील अत्याचारांच्या जुन्या कहाण्याही पुन्हा समोर येत आहेत. यात एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे नादिया गुलाम. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव झालेल्या नादिया १० वर्षे मुलगा बनून तालिबान्यांना मुर्ख बनवत होत्या आणि महिला असूनही विना बुर्का आणि हिजाब फिरत राहिल्या.
2 / 7
तालिबानच्या डोळ्यात धूळ फेकून नादिया गुलाम यांनी आयुष्यातील १० वर्षे पुरूषासारखं जीवन जगलं. त्या अफगाणिस्तानच्या नागरिक होत्या आणि तालिबानची सत्ता आल्यावर त्यांना ना शिकण्याची मुभा होती ना नोकरी करण्याची. लहान वयातच नादिया यांना आपलं घर सांभाळण्यासाठी खोटं बोलावं लागलं. ज्यात त्यांच्या जीवाला पदोपती धोका होता.
3 / 7
नादियाची कहाणी फारच खतरनाक आहे. त्या जेव्हा ८ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्यावर बॉम्ब हल्ला झाला होता. यात नादिया यांच्या भावाचा मृत्यू झाला आणि त्याही जखमी झाल्या होत्या. नादिया यांनी सांगितलं की, त्या हॉस्पिटलमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना बघून हैराण झाल्या होत्या की, युद्ध कशाप्रकारे लोकांचं जीवन उद्ध्वस्त करतो.
4 / 7
नादिया यांनी लोकांना बघून असा निर्णय घेतला की, जो कठिण तर होताच पण त्यात पदोपती जीवाचा धोकाही होता. ११ वर्षाची असताना नादिया यांनी त्यांची ओळख नष्ट केली आणि त्या मुलीच्या मुलगा बनल्या. त्यांनी निश्चय केला होता की, त्यांना त्यांच्या वाट्याचा संघर्ष करायचा आहे आणि मागे हटायचं नाहीये.
5 / 7
नादिया गुलाम इतक्या लहान वयात इतकी मोठी रिस्क घेत होत्या. त्या त्यांच्या लहान भावाची ओळख दाखवत जगासमोर होत्या. नादिया यांनी तालिबानच्या खतरनाक राज्यात आपल्या उद्देशासाठी सगळं काही केलं. अनेकदा त्यांचा भांडाफोड होणारच होता, पण त्या त्यातून वाचल्या.
6 / 7
कामावर जाण्यासाठी नादिया या मुलांचे कपडे घालून जात होत्या. त्या सांगतात की, अनेकदा तर त्या हेही विसरल्या होत्या की, त्या एक मुलगी आहे. १० वर्षे आपल्या परिवाराला आर्थिक मदत देण्यासाठी संघर्ष करत राहिल्या. अखेर १५ वर्षांनी नाादिया एका NGO च्या मदतीने देशातून बाहेर पडण्यात यशस्वी ठरल्या.
7 / 7
त्या आता स्पेनमध्ये अफगाणी शरणार्थी म्हणून आपलं जीवन जगत आहेत. पत्रकार एग्नेससोबत मिळून त्यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक लिहिलं आहे. नादिया अनेक वर्षापासून हे सांगत आहेत की, तालिबान अफगाणिस्तानातून कुठेच गेला नाही. त्या असाही आरोप लावतात की, यूएस आणि इतर देशांच्या सेना अफगाणिस्तानातील लोकांच्या हाती हत्यार देत आहेत. त्यांना दगा देत आहेत.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी