शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' देशात लोक मोठ्या प्रमाणावर बार मध्ये जातात पण दुध पिण्यासाठी, कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 6:05 PM

1 / 11
आफ्रिकन देश रवांडाची राजधानी किगालीमध्ये बार उघडण्यात आले आहेत, याठिकाणी लोकांची गर्दीही असते. पण या बारमध्ये दारू नाही, तर दूध दिले जाते.
2 / 11
याठिकाणी असणाऱ्या टॅपमधून बीअर नाही दूध बाहेर येते. मित्र-मैत्रिणी, कुटुंबासह दूध पिण्यासाठी या मिल्कबारमध्ये गर्दी करतात.
3 / 11
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, किगालीमध्ये लोकं जवळपास रोज बारमध्ये जाऊन दूध पितात. हा त्यांच्या परंपरेचा भाग आहे.
4 / 11
मीडिया अहवालानुसा एका मोटर सायकल टॅक्सी ड्रायव्हर जीन बोस्कोने अशी माहिती दिली की, 'मला दूध प्यायला आवडतं कारण यामुळे मी शांत राहतो. ताण कमी होतो.' जीन आणि त्याच्यासारखे अनेक लोकं तुम्हाला मिल्क बारमध्ये दिसतील.
5 / 11
रवांडामध्ये दूध विशेष लोकप्रिय पेय आहे. याठिकाणी विविध समाजातील माणसं एकत्र वावरताना दिसतात. पुरुष-महिला अशाप्रकारच्या मिल्कबारमध्ये बसलेले पाहायला मिळतील.
6 / 11
दूध त्याचप्रमाणे योगर्टची विशेष मागणी आहे. स्थानिक पातळीवर ते ikivuguto म्हणून ओळखले जाते.
7 / 11
थंड किंवा गरम दूध पिताना स्वत:चा ग्लास पूर्णपणे संपवण्याची पद्धत याठिकाणी आहे. शिवाय केक, रोटी किंवा केळं खाताना देखील त्याबरोबर दूध पिण्यास पसंती दिली जाते.
8 / 11
दूध या देशाच्या संस्कृती, इतिहासाशी जोडले गेले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील दुधाच्या विक्रीचा विशेष परिणाम होतो आहे. रवांडामध्ये गायी आता उत्पन्नाचे मोठे साधन आहेत आणि प्रतिष्ठेची देखील बाब आहे.
9 / 11
१९९४ मध्ये देशात झालेल्या हत्याकांडात सुमारे आठ लाख लोकांचा मृत्यू झाला. मारले गेलेले बहुतेक तुत्सी जातीचे होते. ऐतिहासिकदृष्ट्या, ते मेंढपाळ आणि गुरेढोरे पाळणारे म्हणून ओळखले जायचे.
10 / 11
देश नरसंहारातून सावरत असताना, रवांडाचे सरकार पुन्हा अर्थव्यवस्थेचा विकास आणि कुपोषणाशी लढण्याचा मार्ग म्हणून गायींकडे पाहू लागले आहे.
11 / 11
अध्यक्ष पॉल कागमे यांनी 2006 मध्ये 'गिरिंका' कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश प्रत्येक गरीब कुटुंबाला एक गाय देणे हा आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके