शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रेमाला वयाचं बंधन नसतं! वृद्धावर जडला तरुणीचा जीव; दोघांमध्ये 46 वर्षांचं अंतर, म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 3:26 PM

1 / 10
प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. कॅनडातील एका कपलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्या दोघांचं वय.
2 / 10
तरुणीचं वय 29 वर्षे आहे. तर तिचा बॉयफ्रेंड 75 वर्षांचा आहे. दोघांच्या वयात जवळपास 46 वर्षांचा फरक आहे. फॅबिएन लाफेरियेर असं या तरुणीचं नाव असून लोक तिला खूप ट्रोल करतात.
3 / 10
द सनच्या रिपोर्टनुसार, लोक तिला गोल्ड डिगर म्हणतात. असं म्हटलं जातं की ती तिचा प्रियकर डेनिसच्या मरण्याची वाट पाहत आहे, जेणेकरून तिला नंतर त्याचे सर्व पैसे हडप करता येतील.
4 / 10
प्रेजेंटर आणि मॉडेल असलेल्या फॅबिएनची ही अनोखी लव्हस्टोरी एका चॅरिटी इव्हेंटपासून सुरू झाली. जे लहान मुलांसाठी होतं. येथे डेनिसशी ती संध्याकाळपर्यंत बोलत होती.
5 / 10
फॅबिएन ही या कार्यक्रमाची मेन स्पीकर होते. इथे ती डेनिससह अनेक पाहुण्यांना भेटली. डेनिसने तिला त्याचा नंबर दिला.
6 / 10
फॅबिएन म्हणते की, ती डेनिसच्या प्रेमात पडली कारण तो इतरांपेक्षा वेगळा दिसत होता. डेनिस गेल्या 22 वर्षांपासून तरुणींना डेट करत आहे.
7 / 10
फॅबिएन आता तिच्या या बॉयफ्रेंडसोबत फेसबुक लाईव्ह करते. TikTok आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करते. तिच्या इन्स्टाग्रामवर कपलचे अनेक फोटो आहेत.
8 / 10
दोघेही आपल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत. पण तरीही लोक फॅबिएनबद्दल म्हणतात की ती पैशासाठी डेनिससोबत आहे. पण डेनिस सांगतो की, फॅबिएन स्वतःचा खर्च स्वत:च्या पैशानेच करते.
9 / 10
दोघेही आपल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत. पण तरीही लोक फॅबिएनबद्दल म्हणतात की ती पैशासाठी डेनिससोबत आहे. पण डेनिस सांगतो की, फॅबिएन स्वतःचा खर्च स्वत:च्या पैशानेच करते.
10 / 10
दोघेही आपल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत. पण तरीही लोक फॅबिएनबद्दल म्हणतात की ती पैशासाठी डेनिससोबत आहे. पण डेनिस सांगतो की, फॅबिएन स्वतःचा खर्च स्वत:च्या पैशानेच करते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल