Agent hired to break marriages in japan
खरं की काय? इतरांचा संसार तोडण्यासाठी इथं लाखो रुपये मिळतात; जाणून घ्या हा विचित्र प्रकार By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 6:25 PM1 / 7तुम्ही ऐकलंच असेल लग्न जमवणारे जसे एजंट असतात. त्याचप्रमाणे लग्न तोडण्यासाठी काम करणारेही एजंट असतात. जपामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना हा रोजगार उपलब्ध असतो. एजंटद्वारे लग्न तोडली जातात. कोरोना काळात या क्षेत्रात रोजगार कमी झाला आहे. जर कोणालाही आपल्या पार्टनरवर संशय असेल तर या एजेंट्सची मदत घेता येते. 2 / 7या एजंट्सना वाकरेसारेया असं म्हणतात. पार्टनरच्या हालचालींवर लक्षं ठेवणं हेच त्यांचे काम असते. पार्टनरच्या अनैतिक संबंधांबाबत पुरावे गोळा करावे लागतात. अनेकदा नातं तोडण्यासाठी हे एजंट्स लोकांशी मैत्री करतात. नातं तुटल्यानंतर सोडून निघून जातात. 3 / 7लग्न तोडत असलेल्या या एजंट्सचा व्यवसाय जपानमध्ये जास्त विस्तारत आहे. कारण जेव्हा पार्टनरच्यामागे वाकरेसारेया एजेंट्स म्हणजे लग्न तोडणारे एजंट्स लागतात तेव्हा पार्टनरच्या हालचाली, त्याचं बसणं उठणं याबाबतचे पुरावे गोळा करतात. या पुराव्यांच्या आधारावर घटस्फोट देता येऊ शकतो. जपानमध्ये आपल्या पार्टनरवर संशय घेणं ही गोष्ट सर्रास होत. म्हणून लोक या एजंट्सची नेमणूक करतात. 4 / 7वाकरेसारेया एजंट्सची सेवा खुप महागडी असते. त्यामुळे सर्वच लोकांना एजेंट्सची नेमणूक करणं शक्य नसतं. अलिकडे एक वाकरेसारेया एजंटची हत्या झाल्यामुळे संपूर्ण व्यवसायाला फटका बसला आहे. 5 / 7वाकरेसासेया एजेंट युसुके मोचिजुकी यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर ऑनलाईन जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. महाग आणि वारंवार वादाच्या कचाट्यात सापडूनही हा व्यवसाय सुरळित सुरू आहे. 6 / 7एका कामासाठी एका एजेंटला 3800 डॉलर तसंच मोठ्या कामांसाठी 1.90 लाख डॉलर दिले जातात. कामाच्या आधारावर पैश्यांचे निर्धारण केलं जातं. 7 / 7या व्यवसायातील एजंट्च्या दाव्यावर लोक सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत. कामासाठी जितका जास्त वेळ लागतो तेवढी अधिक पैश्यांची मागणी केली जाते. (image credit-forbes) आणखी वाचा Subscribe to Notifications