९७ किलोच्या धावपटू बाहुबलीची कोरोनाने केली 'अशी' अवस्था; स्वःतला ओळखणंही झालं कठीण By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 12:29 PM
1 / 12 अमेरिकेतील जॉन्स हॉपकिंस रुग्णालयात व्हेंटिलेटरवर जाणारा पहिला कोरोनाचा रुग्ण रिकव्हर झाला आहे. बलाढ्य धावपटू अहमद अय्याद यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मार्चमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या या धावपटूचा एक व्हिडीओ समोर येत आहे. त्यात त्यांनी कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या आयुष्यात कोणते बदल घडले याबाबत सांगितले आहे. 2 / 12 अहमद अय्याद जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा आपल्या तोंडा भोवती मोठी नलिका असेल याची कल्पनाही नव्हती. ९७ किलो वजन असलेल्या धावपटूच्या मासपेशी पूर्णतः कमकुवत झाल्या होत्या. ते स्वतःला सुद्धा ओळखू शकत नव्हते. 3 / 12 अय्याद यांनी सीएनएनला सांगितले की, ''मी जसा शुद्धीवर आलो तशी माझी अवस्था पाहून खूप खचून गेलो. माझ्या पायांना आणि हातांना नक्की काय झालंय याच विचारात मी होतो. '' 4 / 12 अय्याद यांची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती, नंतर त्यांना डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. आता हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सध्या त्यांना श्वास घ्यायला त्रास होणं, फुफ्फुसं आणि हृद्याशी संबंधीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. 5 / 12 अय्याद वॉशिंग्टनमध्ये आपलं रेस्टॉरंट आणि क्लब चालवतात. पण स्वतःला फिट ठेवण्यासाठी मेरॅथोन, ऑब्सटेकल रेस, बास्केट बॉल आणि बॉक्सिंग यात ते नेहमीच सक्रीय होते. 6 / 12 सुरुवातील शिड्या चढताना त्यांना दम लागणं, थकवा येणं, सर्दी, खोकला अशी लक्षण दिसून आली. तापामुळे संपूर्ण शरीर कमकुवत आणि अशक्त झाल्याप्रमाणे वाटू लागले. एका आठवड्याच्या आतच त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. 7 / 12 अय्याद यांनी प्रकृती बरी नसल्यामुळे मित्रांच्या सल्ल्याने वैद्यकिय तपासणी करून घेतली. १५ मार्चला अय्याद रुग्णालयात गेले तेव्हा त्यांना इंफ्लूएंजा आणि कोरोना व्हायरसचं संक्रमण झालं होतं. 8 / 12 अय्याद यांची शारीरिक स्थीती दिवसेंदिवस खालावत होती. डॉक्टरांनी त्यांना जॉन हॉपकिंस रुग्णालयात पाठवले. त्या ठिकाणी त्यांना २५ दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं. कोरोनाची लागण झाल्यानंतर या बलाढ्य धावपटूची अशी अवस्था होईल याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. 9 / 12 जॉन हॉपकिंस रुग्णालयातील डॉक्टर नताली वेस्ट यांनी सांगितले की, अय्याद एक तरूण आणि फीट व्यक्तीमत्व आहे. जर अय्यादसारख्या सुपरफिट व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते. तर कोरोना व्हायरसपासून बचाव करणं खरचं कठीण आहे. 10 / 12 अहमद अय्याद हे कोरोनाशी लढत असलेल्या सगळ्यात रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. तसंच सध्याच्या काळात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. 11 / 12 अहमद अय्याद हे कोरोनाशी लढत असलेल्या सगळ्यात रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. तसंच सध्याच्या काळात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. 12 / 12 अहमद अय्याद हे कोरोनाशी लढत असलेल्या सगळ्यात रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. तसंच सध्याच्या काळात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. आणखी वाचा