शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मॉडेलिंग क्षेत्रात अवतरली जादुई परी; जगात पहिल्यांदाच हे घडलं! कोण आहे सुंदरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 4:18 PM

1 / 10
तंत्रज्ञानाच्या या युगात AI नं नवीन अविष्कार आणला आहे. एआयच्या माध्यमातून अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. त्यात आता ऐटाना लोपेज नावाची स्पेनमधील पहिली AI मॉडेल या मॉडेलिंग क्षेत्रात अवतरली आहे. ही AI मॉडेल एखाद्या खऱ्या युवतीसारखीच दिसते.
2 / 10
क्लूसेस नावाच्या स्पेनच्या कंपनीनं ही मॉडेल समोर आणली आहे. ही मॉडेल निर्माण करण्यामागे काय कारणे आहेत याचाही खुलासा कंपनीने केला आहे. या AI मॉडेलच्या सौंदर्यांची अनेकांना भूरळ पडली आहे. त्यात एका प्रसिद्ध लैटिन अमेरिकन अभिनेत्याने तिला डेटवर जाण्यासाठी विचारणा केली आहे.
3 / 10
यूरोन्यूजशी बोलताना द क्लूसेसचे ऐटानाचे डिझाईन बनवणारे रुबेन क्रूझ यांनी यामागचे कारण सांगितले की, ते म्हणाले की, सध्या कंपनी अनेक अडचणींच्या काळातून जात आहे. कंपनीचे अनेक प्रोजेक्ट रद्द होत आहे. ही फार मोठी समस्या कंपनीसमोर उभी राहिली.
4 / 10
जेव्हा कंपनीनं समस्येचं निराकरण करण्याचं ठरवलं तेव्हा एजन्सीनं स्वयंचिल प्रभावशाली व्यक्ती आणि ब्रँडसाठी एका मॉडेलचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यातून ऐटानाचा जन्म झाला.
5 / 10
ऐटानाला चालवण्यासाठी आणि तिला जिवंत दाखवण्यासाठी एक पूर्ण टीम काम करते. पुढील आठवडाभर ऐटाना काय करणार, कुठे जाणार आणि कोणते फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर अपलोड करणार याचे नियोजन केले जाते.
6 / 10
तुम्ही हे वाचून हैराण व्हाल की या एआय मॉडेल ऐटानाच्या इन्स्टाग्रामवर जवळपास १ लाख २१ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: ऐटानाचे फोटो फोटोशॉपच्या माध्यमातून बनवले जातात.
7 / 10
ऐटाना जे फोटो अपलोड करते ते फोटोशॉपच्या मदतीने विविध स्थळांवर मॉडेलला सुपर इम्पोज करण्यासाठी आणि दुसऱ्या एआय फोटो मिळून जनरेट करण्यात येतात.
8 / 10
गुलाबी केसांची, २५ वर्षीय ऐटाना एक फिटनेस फ्रेंडली, आत्मविश्वास असणारी युवती असल्याचे दिसते. क्रूजनुसार, ती मैड्रिडनंतर स्पेनमधील दुसरे मोठे शहर बार्सिलोना येथील उत्साही महिला आहे.
9 / 10
ऐटाना प्रति जाहिरात १ हजार यूरो म्हणजे जवळपास ९१ हजार रुपये कमाई करते. ऐटाना दर महिन्याला १० हजार यूरो म्हणजे ९ लाख रुपयांची कमाई जाहिरातीतून करते. तिचे मासिक उत्पन्न सरासरी ३ हजार यूरो आहे.
10 / 10
सोशल मीडियाच्या ऐटानाच्या फोटोला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. त्याचसोबत काहींनी तिच्या बोल्ड अदांवर टीका केली आहे. तर'फक्त वास्तविक प्रभावशाली आणि ब्रँड्सद्वारे तयार केलेल्या सौंदर्यशास्त्राचे अनुसरण ऐटाना करते असं क्ल्यूलेस यांनी म्हटलं.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स