शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चेक-इननंतर विमानात कशा ठेवल्या जातात तुमच्या बॅग्स? फोटोत बघा पूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:09 PM

1 / 6
How Suitcases are Stored on Plane: विमानाने प्रवास करताना अनेकदा लोकांना या गोष्टीची चिंता असते की, उड्डाणासाठी बोर्डिंग आणि डेस्टिनेशनपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या बॅग्स कशा हॅंडल केल्या जातात. एअरपोर्टवर काम करणाऱ्या एक बॅगेज हॅंडलरने या गोष्टीचा खुलासा केला आहे.
2 / 6
बॅंगेज हॅंडलरने सांगितलं की, चेक-इननंतर बॅग्स कशाप्रकारे फ्लाइटच्या आतमध्ये ठेवल्या जातात आणि विमान लॅंड झाल्यावर कशाप्रकारे त्या काढल्या जातात.
3 / 6
चेक-इननंतर बॅग्सना बॅगेज व्हॅनच्या माध्यमातून फ्लाइटपर्यंत पोहोचवल्या जातात. यानंतर बॅगेज हॅंडलर फ्लाइटच्या आतपर्यंत एक रोलर पसरवतो. ज्याच्या माध्यमातून फ्लाइटच्या आतपर्यंत बॅग पोहोचवल्या जातात.
4 / 6
बॅग्स फ्लाइटच्या आत पोहोचवल्यानंतर बॅगेज हॅंडलर त्या अरेंज करतो आणि मग एकावर रचतो. बॅग्स ठेवताना या गोष्टीची काळजी घेतली जाते की, त्या चांगल्या प्रकारे पॅक व्हाव्या. जेणेकरून प्रवासादरम्यान त्या पडू नये.
5 / 6
द सनच्या रिपोर्टनुसार, टिकटॉकवर डीजेसुग नावाच्या व्यक्तीने कॅनडातील व्हॅंक्यूअर एअरपोर्टवर बॅग लोड करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १.१३ लाखांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत.
6 / 6
फ्लाइट लॅंड केल्यानंतर बॅगेज हॅंडलर बॅग्स पुन्हा खाली काढतात आणि मग बॅगेज व्हॅनच्या माध्यमातून त्या बॅग रोलरपर्यंत पोहोचवल्या जातात. जिथे प्रवासी बॅग परत मिळवू शकतात.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सairplaneविमान