Alien : Rare book from 1698 reveals belief in extraterrestrial life on Saturn and Jupiter
या दोन ग्रहांवर राहतात एलिअन्स? एका जुन्या पुस्तकात दुसरी दुनिया असल्याचा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 4:19 PM1 / 6जगभरात सध्या एलिअन्सबाबत चर्चा सुरू आहे. अशात एक दुर्मीळ पुस्तक समोर आलं आहे ज्यात दुसरं विश्व असल्याचा दावा केला गेला आहे. हे दुर्मीळ पुस्तक १७व्या शतकात लिहिण्यात आलं होतं जे इंग्लंडमध्ये सापडलं. या पुस्तकात दोन ग्रहांवर जीवन असल्याबाबत सांगण्यात आलं. या दोन ग्रहांची नावं वाचल्यावर तुम्ही अवाक् व्हाल.2 / 6या पुस्तकात ज्या दोन ग्रहांवर जीवन असण्याचा दावा केला गेला आहे ते शनि आणि गुरू आहेत. या पुस्तकातील गोष्टींवर लोक कदाचित विश्वास करणार नाही, पण एलिअन्स आणि दुसऱ्या विश्वावर विश्वास ठेवणारे लोक नक्कीच विश्वास ठेवतील. हे दुर्मीळ पुस्तक ३२४ वर्षाआधी लिहिण्यात आलं होतं. आता या पुस्तकाचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. 3 / 6गणितज्ज्ञ, भौतिक शास्त्राचे अभ्यासक क्रिस्टियान ह्यूंजेस यांनी १६९८ मध्ये हे पुस्तक लिहिलं होतं. त्यांनी प्रश्न उठवत सांगितलं होतं की, काय देव दुसऱ्या ग्रहांचं निर्माण पृथ्वीवरून बघण्यासाठी करेल? त्यांचं मत होतं की, यामागे नक्कीच काहीना काही कारण असायला हवं. ते म्हणाले होते की, तो उद्देश जीवन आहे.4 / 6या पुस्तकात दुसऱ्या दुनियेबाबत बरंच काही लिहिलं आहे. या पुस्तकाचं मुल्यांकन जिम स्पेंसर यांनी केलं आहे. ते म्हणाले की, पुस्तकात लेखकाने हे सांगण्यात प्रयत्न केला आहे की, दुसऱ्या दुनियेत राहणारे कसे दिसत असतील. ते त्यांचा वेळ कसा घालवत असतील आणि त्यांना गाणी ऐकणं कसं वाटत असेल. वैज्ञानिकाने हे तथ्यांशी जोडून सांगण्याचा प्रयत्न केला.5 / 6इंग्लंडमध्ये सापडलेल्या या पुस्तकात अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत. यात सांगण्यात आलं की, कुणालाही दुसऱ्या जगातील लोक पकडू शकतात. तसेच ते काही वस्तू फेकूही शकतात आणि सर्वात मोठी बाब म्हणजे ते जमिनीवरून छोटी वस्तू घेऊही शकतात.6 / 6या पुस्तकात ते कसे दिसतात हेही सांगण्यात आलं आहे. लेखकाने सांगितलं की, त्यांचे पाय विचित्र दिसतात. कुठे कुठे उडूही शकतात. क्रिस्टियान यांनी लिहिलं की, ते बुद्धीमानही आहेत. तसेच ते म्हणाले की, असंही होऊ शकतं की, शनि आणि गुरू मास्टर नेविगेटरही असू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications