Alien technology crashed into pacific ocean know what scientists claimed
अंतराळातून जळत आलेलं एलियनचं विमान समुद्रात झालं क्रॅश, वैज्ञानिकाचा हैराण करणारा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 3:10 PM1 / 8एलियन्सबाबत दररोज काहीना काही दावे केले जातात. अंतराळात एलियन्स आहेत की नाही हे सर्वात मोठं रहस्य आहे. अनेक वर्षांपासून वैज्ञानिक या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एलियन्सबाबत अजूनही काही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. पण दररोज एलियन्सबाबत वेगवेगळे दावे केले जातात. काही लोकांनी पृथ्वीवर एलियन आणि यूएफओ बघितल्याचा दावा केला आहहे. अशात आता हार्वर्डच्या एका वैज्ञानिकाने दुसऱ्या ग्रहावरील जीवाबाबत नवा दावा केला आहे. 2 / 8वैज्ञानिकाने दावा करत सांगितलं की, एलियन्सचं एक विमान म्हणजे यूएफओ प्रशांत महासागरात क्रॅश झाल्याची शक्यता आहे. वैज्ञानिक हा दावा सिद्ध करण्यासाठी एका मिशनच्या तयारीत लागले आहेत. आता येणाऱ्या काळात समजेल की, वैज्ञानिकाच्या या दाव्यात किती सत्य आहे. 3 / 8एका मीडिया रिपोर्टनुसार, एस्ट्रोफिजिसिस्ट एवी लोएबने दावा केला आहे की, एका स्पेसक्राफ्टसारखी दिसणारी वस्तू पृथ्वीवर दुर्घटनाग्रस्त झाली आणि पापुआ न्यू गिनीच्या मॅनुस द्वीपाच्या तटासोबत त्याची टक्कर झाली. अमेरिकी स्पेस कमांडने याबाबत सांगितलं की, हे केवळ एक उल्कापिंड होतं.4 / 8एवी लोएबने याआधीही अशाप्रकारचे दावे केले आहेत. ज्यामुळे ते चर्चेत आले होते. ते बऱ्याच वर्षांपासून अंतराळावर शोध करत आहे. वैज्ञानिक नेहमीच त्यांच्या दाव्याशी सहमत नसतात.5 / 8त्यांनी त्यांच्या एका शोधात सांगितलं की, एक इंटरस्टेलर उल्कापिंडाने आमच्या शोधात एका नव्या शोधाची सुरूवात झाली. लोएब आपल्या थेअरीवर शोध करण्याची तयारी करत आहे. त्यांनी सांगितलं की, महासागरातून ते कशाप्रकारे वस्तू बाहेर काढणार.6 / 8एस्ट्रोफिजिसिस्ट एवी लोएबने सांगितलं की, ते प्रशांत महासागरातून वस्तू बाहेर काढण्यासाठी स्कूपिंग मॅग्नेटचं वापर करतील. त्यांचं स्वप्न एका अशा उपकरणाचं बटन दाबणं आहे ज्याची निर्मिती पृथ्वीच्या बाहेर झाली आहे.7 / 8स्ट्रोफिजिसिस्ट एवी लोएब यांनी हार्वर्डसोबत काम केलं आहे. त्यांचं मत आहे की याआधीही एलियनसंबंधीत टेक्नॉलॉजी पृथ्वीवर पडल्या आहेत. ते म्हणाले की जास्तीत जास्त वैज्ञानिकांचं मत आहे की, ओउमुआमुआ एका इंटरस्टेलर ऑब्जेक्टचं निर्माण अंतराळात कृत्रिम पद्धतीने झालं आहे.8 / 8लोएब म्हणाले की, महासागरात अंतराळातून पडलेल्या वस्तू जमा करून त्यांची निर्मिती आणि संरचना यांचा रिसर्च केला जाऊ शकतो. आता लोएब यांच्या या दाव्याने पुन्हा एकदा वैज्ञानिकांना चकित केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications