शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' Twin Town मध्ये जन्माला आलेली सगळीच मुलं होतात जुळी; जगातील संशोधकही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 3:15 PM

1 / 6
गावात अथवा शहरात एक, दोन जुळी मुलं जन्माला आल्याचं तुम्ही ऐकलं असेल पण एकाच गावात जन्माला येणारी बहुतांश मुलं-मुली जुळी आहेत हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
2 / 6
केरळ राज्यातील मल्लापुरम जिल्ह्यात कोडीनी गाव...या गावाचं नाव जगाच्या पातळीवर गाजत आहे. विविध देशातील संशोधक या गावात येऊन संशोधन करत आहेत. याला कारणही तसचं आहे की, या गावात जन्मलेली बहुतांश मुलं जुळी असतात.
3 / 6
कोडीनी, जवळपास २ हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे, या गावात एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल ३५० हून अधिक जुळी मुलं राहतात. त्यामुळे गावातील शाळेत, बाजारात सगळीकडे तुम्हाला एकसारखीच मुले दिसतात.
4 / 6
या गावात नवजात शिशूपासून ६५ वर्षाच्या आजीपर्यंत जुळी माणसं तुम्हाला पाहायला मिळतील, एका अभ्यासानुसार भारतामध्ये प्रति १ हजार नवजात बालकांमध्ये ४ जुळी मुलं जन्मतात अशी आकडेवारी आहे. मात्र या गावात १ हजारमध्ये ३५ जुळी मुलं जन्माला येतात.
5 / 6
जगातील अनेक माध्यमं या गावात स्टोरी कव्हर करायला येतात, अनेक संशोधक या गावात अभ्यास करण्यासाठी येतात. भारत सरकारनेही आपल्या एका संशोधकाची टीमला याचा अभ्यास करण्यासाठी जबाबदारी दिली आहे.
6 / 6
स्थानिक डॉक्टरांच्या मते, जुळ्या मुलांपैकी एक आजारी पडला तर डॉक्टर दोघांनाही औषध देतात. कारण एक आजारी पडला तर दुसराही आजारी पडत असल्याचं दिसून आलं आहे.
टॅग्स :Keralaकेरळ