Amazing Fact What will you do if the sun is destroyed who Will survive and who will die
Amazing Fact: सूर्य नष्ट झाला तर काय कराल? कोण जिवंत राहील आणि कोण घेईल जगाचा निरोप? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 12:16 PM1 / 6पृथ्वी आपल्या कक्षेत फिरत असते. त्यामुळे दिवस आणि रात्र होते. पण विचार करा, की जर आपण एखाद्या रात्री झोपलात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवलाच नाही तर काय होईल? आपल्या मनात कधी असा प्रश्न आला? तर आज याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. 2 / 6वैज्ञानिकांच्या मते, सूर्याचे वय जवळपास 9 अब्ज वर्षांपेक्षाही अधिक आहे. सूर्यमालेतील खगोलीय पिंडांमधील गुरुत्वाकर्षण बल त्याला अवकाशामध्ये स्थिरता देते. एका ठराविक वेळेच्या अंतराने हे सर्व परिक्रमा करत सूर्या भोवती फिरत असतात. या फिरण्यामुळेच प्रत्येक ग्रहाचे वर्ष आणि दिवस-रात्र निश्चित होतात.3 / 6सूर्य नष्ट झाला तर काय होईल? - सूर्य उगवलाच नाही, तर सर्वप्रथम काय होईल हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अर्था पृथ्वी आणि सूर्यमालेतील सर्वच ग्रहांवर अंधःकार निर्माण होईल आणि असेच सुरू राहिले तर पृथ्वीवरील तापमान हळू-हळू कमी व्हायला सुरुवात होईल. परिणामी संपूर्ण पृथ्वी बर्फमय होईल.4 / 6महत्वाचे म्हणजे, झाडे आणि वनस्पतींसाठी सूर्यप्रकाश अत्यंत महत्वाचा आहे. जर सूर्य उगवलाच नाही अथवा नष्ट झाला, तर पृथ्वीवरील झाडे आणि वनस्पती जीवन नष्ट होईल. याच बरोबर मोठ मोठ्या जीवांचे अस्तित्वही संपुष्टात येईल. एवढेच नाही, तर मानवी जीवनही संपुष्ट होईल.5 / 6सूर्यच नसेल, तर चद्र प्रकाशही मिळणार नाही. कारण चाद्र स्वतःच सूर्य प्रकाशामुळे चमकतो. आता प्रश्न असा, की जर सर्वच नष्ट होणार, तर मग वाचणार कोण? तर, याचे उत्तर आहे, जे जीव वातावरणानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतील, केवळ असेच जीव जिवंत राहू शकतील.6 / 6अशा परिस्थितीत, समुद्राच्या तळाशी असलेले काही जीव पृथ्वीच्या केंद्रातील ऊर्जेच्या सहाय्याने जिवंत राहण्यात यशस्वी होऊ शकतात. ते जिवंत राहू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications