शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कमालच झाली! स्वीमिंगसाठी गेलेली महिला अचानक झाली गायब, २० दिवसांनी नग्नावस्थेत ड्रेनेजमधून तिला काढलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 2:10 PM

1 / 12
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेला नग्नावस्थेत रेस्क्यू टीमने एका स्टॉर्म ड्रेनेजमधून सुखरूप बाहेर काढलं. महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला स्वीमिंगसाठी गेली होती आणि यादरम्यान अचानक गायब झाली होती.
2 / 12
फ्लोरिडामध्ये राहणारी लिंडसे केनेडी गेल्या २० दिवसांपासून गायब होती आणि फायर ब्रिगेडने मंगळवारी तिला गटारातून बाहेर काढलं. महिलेने सांगितले की, ती गेल्या २० दिवसांपासून ड्रेनेजममध्ये आतल्या आत रस्त शोधत फिरत राहिली. पण तिला बाहेर येण्याचा मार्ग काही सापडला नाही.
3 / 12
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, महिला ३ मार्च रोजी स्वीमिंगसाठी गेली होती. पण काही दूरपर्यंत स्वीमिंग केल्यानंतर तिला एका टनलचा दरवाजा दिसला. ती त्यात गेली आणि हरवली. अनेक प्रयत्न करूनही तिला बाहेर येण्याचा मार्ग सापडला नाही.
4 / 12
महिला २० दिवस ड्रेनेजच्या आज फिरत राहिली आणि २३ मार्चला तिला एका ठिकाणाहून प्रकाश येत असल्याचं दिसलं. त्या प्रकाश येत असलेल्या ठिकाणाजवळ ती गेली. पण ते ठिकाण फार उंच होतं. तिने तेथून एका व्यक्तीला जाताना पाहिलं. अशात तिने मदतीसाठी जोरात आवाज दिला.
5 / 12
तिचा आवाज ऐकून त्या व्यक्तीने गटरच्या आत पाहिलं तर त्याला नग्नावस्थेत एक महिला दिसली. त्याने लगेच मदतीसाठी फोन लावला. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या जवानांनी ८ फूट खोल सीवेजमधून महिलेला बाहेर काढलं.
6 / 12
लिंडसे केनेडीच्या आईने अधिकाऱ्यांना सांगितलं की, त्यांची मुलगी मानसिक आजारी आहे आणि ड्रग्सची हिस्ट्रीही आहे. तपासातून समोर आलं की, ३ मार्च रोजी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
7 / 12
आता हे स्पष्ट नाही की, अधिकाऱ्यांनी लिंडसे केनेडीच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. पण त्यांनी हे मान्य केलं की, महिला टनलमध्ये तिच्या मर्जीने गेली होती. डेलरे बीच पोलीसचे प्रवक्ता टेड व्हाइटने सांगितले की, सुरूवातीच्या तपासात समोर आलं की, केनेडीसोबत जबरदस्ती किंवा फसवणुकीचे संकेत मिळाले नाही. असं वाटतं की, ती तिच्या मर्जीने टनलमध्ये गेली होती.
8 / 12
फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला २० दिवसांपर्यंत ड्रेनच्या आत भटकत राहिली आणि नंतर तिला बाहेर काढण्यात आलं. एका अधिकाऱ्यांने सांगितले की, महिला फार कमजोर झाली आहे आणि तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
9 / 12

10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके