शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेने एलिअन्सला करून ठेवलंय कैद, एरिया 51 मध्ये काम केलेल्या इंजिनिअरचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 4:35 PM

1 / 6
जगभरात कितीतरी रहस्य आहेत. कितीतरी रहस्यमय ठिकाणं आहेत. यातील एक आहे अमेरिकेतील एरिया-51. जिथे फारच कडक सुरक्षा असते. अमेरिकेतील या ठिकाणी कुणालाही जाण्याची परवानगी नसते. काही थेअरींमध्ये दावा केला जातो की, अमेरिकेतील एरिया-51 मध्ये एलिअन्सना कैद करून ठेवण्यात आलं आहे. अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयएने 2013 मध्ये या ठिकाणाबाबत सांगितलं होतं.
2 / 6
आता एरिया-51 मध्ये काम केलेल्या एका माजी इंजिनिअरने हैराण करणारा दावा केला आहे. या माजी इंजिनिअरचा दावा आहे की, अमेरिकेने इथे एलिअन्सना बंदी बनवून ठेवलं आहे. बिल यूहाउसच्या रिपोर्टनुसार, त्यांनी अमेरिकेच्या या गुप्त ठिकाणावर काम केलं आणि इथे खरंच एलिअन्स होते. चला जाणून घेऊ या इंजिनिअरने काय केलाय दावा.
3 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या माजी इंजिनिअरचं वय 71 वर्ष आहे आणि तो एलिअन्स तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. सांगण्यात आलं की, एरिया 51 बाबत त्याच्याकडे बरीच माहिती आहे आणि त्याने तिथे एक्परिमेंट्सही केले आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, एरिया-51 च्या माजी इंजिनिअरने सांगितलं की, याचं कारण आहे की, लोकांना या ठिकाणी असलेल्या एलिअन्सबाबत काहीच माहिती नाही. ते म्हणाले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आइजनहावर यांच्याशी याचा संबंध आहे.
4 / 6
यूहाउसने याआधीही अमेरिकेच्या गुप्त मिल्ट्री बेसवर घालवलेल्या वेळाबाबत खुलेपणाने सांगितलं आहे. रिपोर्ट्सनुसार, एलिअन टेक्नॉलॉजीटी डिसमेंटलिंगवर यूहाउस आणि इतर इंजिनिअर काम करत होते. सैन्य अधिकारी एलिअन्सकडून मिळालेल्या टेक्नॉलॉजीची रिवर्स-इंजिनिअरींग करत होते.
5 / 6
रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, एरिया 51 मध्ये एलिअन्सला ईबीई म्हणून ओळखत होते. दुसऱ्या इंजिनिअऱच्या टीमसोबत यूहाउस काम करत होते. तीन कॅटेगरीमध्ये एलिअन्सना मॉनिटर केलं जात होतं. ज्यात स्मॉल, मीडियम आणि टॉल यांचा समावेश होता.
6 / 6
यूहाउसचा दावा आहे की, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रने एक शांती करारावर स्वाक्षरी केली होती. संयुक्त राष्ट्र आणि तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आइजनहावर यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. एलिअन तज्ज्ञानुसार, या करारामुळेच ही साइट गुप्त ठेवण्यात आली आहे.
टॅग्स :AmericaअमेरिकाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स