शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५०० कोटी रूपयांपेक्षा अधिक किंमतीला विकली गेली ही JPEG फाईल, बनला विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 5:42 PM

1 / 6
केवळ एक JPEG फाईल ही ५०० कोटी रूपयांपेक्षा अधिक किंमतीला विकली गेली आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. अमेरिकन आर्टिस्ट बिपल याची एक डिजिटल फाईल (JPEG) ची ५३ कोटी रूपयांना विक्री झाली आहे. खरं तर हा फोटो म्हणजे निरनिराळ्या फोटोचा मिळून एक कोलाज आहे. विशेष म्हणजे याचं कोणतंही फिजिकल व्हर्जन उपलब्ध नाही. (फोटो- AP)
2 / 6
ब्रिटनची एक ऑक्शन कंपनी क्रिस्टीद्वारे या कोलाजचा लिलाव करण्यात आला. या कोलाजचं नाव 'Everydays: The First 5,000 Days' असं आहे. लिलावाच्या दोन आठवड्यांनंतर हा कोलाज ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला. (फोटो - रॉयटर्स)
3 / 6
कोलाजची सुरुवातीची किंमत केवल ७,२०० रुपये इतकी ठेवण्यात आली होती. आजकाल ब्लॉकचेन टॅक्नॉलॉजीद्वारे डिजिटल वस्तूंना युनित वस्तूंमध्ये बदललं जातं. त्यानंतर त्यांची मोठ्या किंमतीत विक्रीही केली जाते. याला Non-Fungible Token (NFT) असं म्हटलं जातं. बिपल या आर्टिस्टचं हे कोलाज सर्वात महागडं कोलज ठरलं आहे. (फोटो- रॉयटर्स)
4 / 6
बिपलच्या यो कोलाज फोटोंमध्ये एकूण ५ हजार फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. (फोटो- रॉयटर्स)
5 / 6
हे फोटो गेल्या १३ वर्षांमध्ये तयार केलेले आहेत. बिपलनं केवळ एका दिवसात एक फोटो तयार केला आहे. (फोटो - AFP)
6 / 6
बिपलच्या या फोटोची ५०३ कोटी रूपयांना खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. यापूर्वी बिपलनं पॉप सिंगर जस्टिन बिबर, केटी पेरी यांच्यासोबतही काम केलं आहे. बिपलचे सध्ये इन्स्टाग्रामवर २० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :Americaअमेरिकाonlineऑनलाइनdigitalडिजिटल