शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकन सैनिकानं चोरली होती हिटलरची पर्सनल टॉयलेट सीट; आता 'एवढ्या' रुपयांना झाला लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 3:48 PM

1 / 10
जर्मनीतील विवादीत हुकूमशाहा (adolf hitler) एडोल्फ हिटलरच्या घरातून लुटून आणलेल्या सामानाला आता अमेरिकन कुटुंबाकडून विकलं जात आहे. या वस्तूंपैकी सगळ्यात जास्त चर्चेत असलेली वस्तू म्हणजे हिटलरची टॉयलेट सीट.
2 / 10
हिटलरच्या टॉयलेट सीट ची लिलाव किंमत ५ हजार डॉलरपासून सुरू झाली होती. ही किंमत १५ हजार डॉलरपर्यंत जाऊ शकते असा अनेकांचा अंदाज होता. दरम्यान १९ हजार डॉलर म्हणजेच १३ लाख रूपयांना या टॉयलेट सीटचा लिलाव झाल्यामुळे कुटुंब खूपच आनंदी आहे.
3 / 10
दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या दिवसात हिटलरला मारल्यानंतर अमेरिकेची सेना Berctesgaden ला पोहोचली होती. त्या ठिकाणी हिटलरचं एक घर होतं. पर्वतीय भागात असलेल्या या घरात हिटलर कधी कधी येत होता. बॉम्बस्फोट आणि गोळीबारामुळे या शहरातील अनेक शहरं उद्धवस्त झाली होती. त्याचवेळी एका अमेरिकन सैनिकानं हिटलरच्या घरात घुसून त्याची टॉयलेट सीट चोरी केली होती.
4 / 10
रैनवाल्ड बोर्च नावाच्या या अमेरिकन सैनिकाला फ्रेंच, जर्मन भाषा येत होत्या. या सैनिकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संदेश मिळाला होता की, हिटलरच्या घरातून ज्या वस्तू आणता येतील त्या सगळ्या आणायच्या होत्या. त्यानंतर हिटलरचे पर्सनल टॉयलेटसुद्धा सैनिक घेऊन आले होते.
5 / 10
पांढऱ्यां रंगाची वुडेन टॉयलेट सीट ४५ इंचाची आहे. बोर्चनं जहाजाच्या माध्यमातून हे टॉयलेट सीट अमेरिकेत आणलं होतं. त्यानंतर न्यू जर्सीच्या घराच्या तळाला हे टॉय़लेट सीट ठेवण्यात आलं होतं.
6 / 10
८ फेब्रुवारीला मॅरीलँडमध्ये एलेक्जेंडर हिस्टॉरिकलचे ऑक्शन्स कंपनीने आयोजन केलं होतं. या ऑक्शन कंपनीन दिलेल्या माहितीनुसार बोर्चने टॉयलेट सीट आणि सामान घरात आणून तळाशी ठेवले होते.
7 / 10
या व्यतिरिक्त हिटलरच्या काही वैयक्तीक सामानाचा लिलाव झाला आहे. यात शेविंग मगचा सुद्धा समावेश होता. या व्यतिरिक्त पॅराशुट रेजीमेंटनं हिटलरचा हेअरब्रशसुद्धा लुटला होता.
8 / 10
तुमचा विश्वास बसणार नाही पण हेअरब्रशला अडकलेल्या केसांचाही लिलाव झाला होता.
9 / 10
तुमचा विश्वास बसणार नाही पण हेअरब्रशला अडकलेल्या केसांचाही लिलाव झाला होता.
10 / 10
तुमचा विश्वास बसणार नाही पण हेअरब्रशला अडकलेल्या केसांचाही लिलाव झाला होता.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेhistoryइतिहास