Amsterdam airport use 3D fly sticker to cut the cost of cleaning toilet
टॉयलेटमध्ये माशी बसल्यामुळे टॉयलेट साफ करण्याचा खर्च लाखोंनी कमी झाला, जाणून घ्या सत्य By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 6:59 PM1 / 10सर्वप्रथम अॅमस्टरडॅमच्या विमानतळावर हे एक्प्रिमेंट सुरू करण्यात आले आणि या प्रयोग सक्सेसही झाला2 / 10हे शक्य झालं एका माशीच्या साह्याय्याने. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे.3 / 10तुम्हाला जर यामगची कल्पना सांगितली, तर तुम्ही देखील या कल्पनेचं कौतुक कराल. ही कल्पना ऐकायला कशीही वाटत असली तरी, ती यशस्वी ठरली आहे.4 / 10अलीकडेच एक अहवाल समोर आला आहे, ज्यात असे सांगण्यात आले आहे की, ही कल्पना अॅम्सटरडॅमच्या विमानतळावर आखण्यात आली होती आणि परिणामी विमानतळाच्या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेचा खर्च 8 टक्क्यांनी कमी झाली आहे.5 / 10होय, आता विमानतळाला शौचालय स्वच्छ करण्यासाठी खूप कमी खर्च येतो. अशा परिस्थितीत जाणून घ्या की कल्पना नक्की आहे तरी काय? आणि त्यामुळे शौचालयाच्या स्वच्छतेचा खर्च कसा कमी करता येतो?6 / 10अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी शौचालयाच्या भांड्याच्या आता माशी बनवली जाते. म्हणजेच त्यावर माशीचे 3D सारखे स्टिकर लावले जाते, ज्यामुळे लोकं घाण कमी करतात.7 / 10मानवी वृतीप्रमाणे व्यक्ती त्या माशीला टार्गेट करतो. म्हणजेच, तो लघवीने करत असताना त्याच्या लघवीची धार त्यामाशीवर ठेवतो आणि माशीला तेथून उडवण्याचा प्रयन्त करतो.8 / 10यामुळे होते काय की, पुरूष आजूबाजूला घाण न करता, त्या भांड्यातच लघवी करतात, यामुळे साफसफाईचा खर्च कमी झाला आहे.9 / 10प्रयोग सक्सेस झालेला पाहून यानंतर ही कल्पना अनेक कंपन्या, संस्था आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वापरली गेली आणि यामुळे साफसफाईच्या खर्चाची मोठी बचत होत आहे.10 / 10एक माशी किती फायद्याची ठरु शकते याची कल्पना तुम्हा आली असेलच. आणखी वाचा Subscribe to Notifications