शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सर्व निळ्या डोळ्यांचे लोक एकमेकांचे नातेवाईक?; रिसर्चमधून हैराण करणारा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 6:10 PM

1 / 9
आपल्या आजूबाजूला अशी व्यक्ती आपण जवळपास सर्वांनीच पाहिली असेल, ज्यांचे डोळे निळे आहेत. निळे डोळे म्हणजे निळ्या बाहुल्या असलेले डोळे. काळ्या किंवा तपकिरी डोळ्यांचे स्वतःचे वेगळे सौंदर्य असते, ते कोणाचेही मन आकर्षित करतात
2 / 9
पण असे म्हणतात की निळ्या डोळ्यांमध्ये जादू भरलेली असते. त्यांच्यात रहस्ये दडलेली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की निळ्या डोळ्यांच्या लोकांमध्ये काही संबंध आहे? ते संबंधित असू शकतात? हा प्रश्न आम्ही करत नाही तर एक हैराण करणारा रिसर्च रिपोर्ट समोर आला आहे.
3 / 9
रिसर्च रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, सर्व निळ्या डोळ्यांचे लोक हजारो वर्षांपूर्वी जन्मलेल्या एकाच मानवाचे वंशज आहेत. कोपनहेगन विद्यापीठाच्या संशोधकांनी अतिशय रंजक संशोधन केले आहे. पृथ्वीवर संपूर्ण निळ्या डोळ्यांची लोकसंख्या पिढ्यानपिढ्या एकाच जनुकाची आहे असं या संशोधकांचे म्हणणे आहे
4 / 9
या संशोधनाचा आधार काय? - डेलीस्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कोपनहेगन विद्यापीठाच्या संशोधनानुसार डोळ्यांचा रंग जितका जास्त तितका जनुकांमध्ये फरक होण्याची शक्यता जास्त असते. कारण डोळ्यांच्या रंगाचा थेट संबंध बुबुळाच्या पुढील थरातील मेलेनिनच्या प्रमाणाशी असतो.
5 / 9
विशेष म्हणजे निळ्या डोळ्यातील हे साम्य कोणत्याही एका भौगोलिक वातावरणापुरते मर्यादित नाही. हे जगभर सापडले आहे. जेव्हा जगातील लाखो लोकांच्या निळ्या डोळ्यांची चाचणी घेण्यात आली तेव्हा त्यांच्यामध्ये HERC2 जनुक अनिवार्यपणे आढळून आले असे संशोधनात सांगण्यात आले आहे
6 / 9
निळे डोळे कसे बनतात? - तज्ज्ञांच्या मते, HERC2 जेव्हा OCA2 जनुकाला ब्लॉक करते तेव्हा व्यक्तीचे डोळे निळे पडतात. कारण OCA2 जनुक केवळ डोळ्यातील तपकिरी रंगाचे प्रमाण नियंत्रित करते. जर त्याचे प्रमाण कमी झाले तर डोळ्यांचा रंग हलका आणि पिवळा होतो.
7 / 9
या कारणास्तव, कोपनहेगनच्या संशोधन पथकाने म्हटले आहे की, जर तुमचे डोळे निळे असतील तर तुम्ही तुमचा वंश सहज शोधू शकता. अहवालानुसार, निळे डोळे असलेल्या माणसांचा एकच पूर्वज आहे. जे ६००० ते १०००० वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर राहत आहेत.
8 / 9
निळे डोळे ही केवळ एका देशाची ओळख नाही. हे कोणत्याही देशात पाहिले जाऊ शकते. भारत असो किंवा इंग्लंड, फ्रान्स किंवा अमेरिका - कोणत्याही देशात निळे डोळे असलेले लाखो लोक असू शकतात. भारतातही अनेकांचे डोळे निळे आहेत.
9 / 9
एका आकडेवारीनुसार, जगातील सुमारे ८ ते १० टक्के लोकांचे डोळे निळे आहेत. आत्तापर्यंत केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, जर दोन्ही पालकांचे डोळे निळे असतील तर त्यांच्या मुलांचे डोळे कधीही तपकिरी असू शकत नाहीत असं म्हटलं आहे.