लहानपणी आईचे कपडे घालून बघायचा WWE रेसलर; आता बनला ट्रांसजेंडर, उलगडला संपूर्ण प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 13:28 IST
1 / 7WWE मध्ये आपल्या फायटींगने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या रेक्सनं अलिकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानं दिलेल्या माहितीनुसार तो एक ट्रांसजेंडर आहे आणि गॅबी टुफ्ट या नावानं त्यांना ओळखलं जाणार आहे. गॅबीनं लांबलचक इंस्टाग्राम पोस्ट लिहून ट्रांसजेंडर होण्यााबाबत सांगितले आहे.२००९ ते २०१४ पर्यंत ते रेसलिंगमध्ये एक्टिव्ह होते. 2 / 7ग्रॅबीने एक प्रेस रिलीज प्रसारित केला होता. यात असं लिहीलं होतं की, WWE स्टार ते बॉडीबिल्डर, फिटनेस गुरू ते मोटीव्हेशनल स्पीकर, मोटारसायकल रेसर आणि आता एका महिलेपर्यंत चांगला प्रवास केला आहे. उत्तम रेसलिंग करिअर असलेल्या आणि रिंगमध्ये लढणाऱ्याच्या मनात एक लढाई सुरू होती. आज ती लढाई ते आज जिंकलेले आहेत.3 / 7२०१४ मध्ये गॅबीनं आपल्या कुटुंबासह जास्तवेळ घालवण्यासाठी रेसलिंग सोडले होते. ते एक फिटनेस गुरू आणि मोटीवेशनल स्पीकरसुद्धा आहेत. गॅबीनं सांगितले की ''आमच्यासाठी हे सोपं नव्हतं. मागचे आठ महिने हे खूपच कठीण स्थितीत गेले. खूप ताणतणावाचं वातावरण होतं पण ज्यावेळी मी लोकांचा विचार करणं सोडलं त्यावेळी खूप आनंदी झालो.'' 4 / 7एका मुलाखतीत या रेसलरनं सांगितले होते की, ''जेव्हा मी १० वर्षांचा होतो तेव्हा आईचा ड्रेस घालून पाहायचो. माझ्या व्यक्तीमत्वाबद्दल लोकांशी बोलयचो.5 / 7मला माझ्या पत्नीने यासाठी खूप पाठींबा दिला. २००२ मध्ये मी लग्न केलं, आता एक ९ वर्षांची मुलगीसुद्धा आहे. सध्या मी पत्नीसह जास्त सेक्शुअली एक्टिव्ह नाही.''6 / 7शेवटी त्यांनी सांगितले की, ही एक अशी कहाणी आहे. जी रेसलिंग इतर स्पोर्ट्स, फॅन्स, फॉलोअर्सनी मिस करू नये. 7 / 7खासकरून एलजीबी कम्यूनिटीच्या लोकांनी नक्कीच ही कहाणी ऐकायला हवी.