शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारीच! औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली काश्मिर सारखी सफरचंद; २० वर्षांपर्यंत येतात फळं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 1:53 PM

1 / 5
तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल सफरचंद काश्मिर, हिमाचल प्रदेशसारख्या थंड हवामान असलेल्या ठिकाणी पिकवले जातात. आता एका खास प्रकारचे सफरचंद बिहारमधील औरंगाबादच्या शेतकऱ्याने पिकवून चांगले उत्पन्न घेतलं आहे. अमरेश कुमार सिंह हे औरंगाबादच्या कर्महीड गावाचे रहिवासी आहेत. त्यांनी सफरसंदाच्या खास प्रजातींची शेती आपल्या २ कठ्ठा जमिनीवर करायला सुरूवात केली आहे.
2 / 5
डिसेंबरमध्ये त्यांनी हरमन ९९ सफरचंदाची झाडं लावली होती. आता ही झाडं मोठी होऊन त्या झाडांवर फळंसुद्धा आली आहे. त्यांनी सांगितले की, एकदा झाडावरची सफरचंद तोडली होती. आता प्रोत्साहित होऊन उत्पन्न अधिक वाढवलं आहे. या सफरचंदाची किंमतही जास्त आहे. या प्रकारच्या सफरचंदाची शेती करून चांगले उत्पन्न घेता येऊ शकतं. कारण बाजारात मागणीही वाढत आहे.
3 / 5
या सफरचंदाच्या पीकांना हरमन ९९ असं नाव देण्यात आलं आहे. हरमन ९९ हे गरम वातावरणातही सहज पिकवलं जाऊ शकतं. अंगणात किंवा बगिच्यात हे झाडं लावता येतं. त्यांनी सांगितले की, आपला जिल्हा आणि बिहारच्या मातीत हे पीक सहज घेता येऊ शकतं.
4 / 5
अमरेश कुमार एक सुशिक्षित शेतकरी आहेत. त्यांनी शेतीमागचं तंत्र आणि विज्ञान समजून घेऊन पीक घ्यायला सुरूवात केली. त्यांनी सांगितले की, या प्रकारच्या सफरचंदाच्या शोध १९९९ मध्ये लागल्यानंतर हरमन शर्मा या तज्ज्ञाने २००१ मध्ये पहिलं पीक लावलं.त्यानंतर काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत या प्रकारच्या सफरचंदाची शेती करायला सुरूवात झाली.
5 / 5
आता औरंगाबादमध्ये या पिकाची शेती यशस्वीरित्या केली जात आहे. गहू, बाजरी, सोयाबीन या पिकांव्यतिरिक्त फळांच्या पीकांकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास नफा वाढू शकतो. अमरेश सध्या शेती करत असताना इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतात. इतर पीकांबरोबरच सफरचंदासारख्या पिकांची लागवड केल्यास मिळकत वाढून शेतकरी आत्मनिर्भर बनू शकतो असा विश्वास त्यांना आहे. (Image Credit- Aajtak)
टॅग्स :FarmerशेतकरीBiharबिहार