30 वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगारानं अचानक केलं आत्मसमर्पण, जाणून घ्या कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 4:46 PM
1 / 5 सिडनी: कोरोनानं जगभरातील लोकांची जीवनशैली बदलून गेली. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. पण, कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये अशी घटना घडली आहे, ज्याबद्दल कोणी विचारही केला नसेल. कोरोनामुळे 30 वर्षांपासून फरार असलेला एक गुन्हेगार स्वतःहून पोलिसांना शरण आला आहे. 2 / 5 द इंडिपेंडंटच्या बातमीनुसार, 64 वर्षीय डोर्को देशिक 1992 मध्ये ग्राफटन तुरुंगातून पळून गेला होता. त्यानंतर इतक्या वर्षापासून तो मजुरी करुन पोट भरू लागला. पण, कोरोना लॉकडाऊनमुळे लागलं आणि त्याला आपली नोकरी गमवावी लागली. पैसे नसल्यामुळे तो बेघरही झाला. सिडनीतील लॉकडाऊनमुळे अनेक वेळा त्याला रस्त्यावरही झोपावं लागलं. अशा परिस्थितीत त्यानं राहायला छत आणि वेळेवर जेवण मिळेल, या आशेने पोलिसांना सरेंडर जाण्याचा विचार केला. 3 / 5 पोलिसांनी सांगितलं की, शनिवारी रात्री डोर्को देशिकने सिडनी पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलं आणि मंगळवारी कोर्टात हजेरी लावताना जामीन घेण्यासही नकार दिला. 1992 मध्ये त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. सुनावणीदरम्यान तो म्हणाला की, मी आता या सगळ्याला कंटाळलो आहे. मला राहायला छत आणि वेळेवर जेवण मिळावं म्हणून तुरुंगात जायचं आहे. 4 / 5 बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केल्याबद्दल डोर्को देशिकला 1991 मध्ये अटक करण्यात आली होती. जुलै 1992 मध्ये तो तुरुंग तोडून पळून गेला होता. तुरुंगातून पळून जाण्याचे कारण सांगताना, डोर्को म्हणाला की, त्याला भीती वाटतं होती की, जर त्यानं त्याच्या मूळ युगोस्लाव्हिया देशात लष्करी प्रशिक्षण घेतलं नाही तर त्याला ही शिक्षा पूर्ण झाल्यानंतर परत मायदेशी पाठवलं जाईल. 5 / 5 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोर्कोने आपला बहुतेक वेळ सिडनीच्या उत्तर भागात असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर घालवला आहे. तिथे तो आपले आयुष्य लो प्रोफाइलमध्ये जगत होता. पण, जेव्हा एका टीव्ही कार्यक्रमात त्याला ऑस्ट्रेलियाचा मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा त्याला धक्का बसला आणि त्यानंतर त्यानं आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. आणखी वाचा