An australian couple is accused of making indian woman slave for eight years in their home
ऑस्ट्रेलियन जोडप्यानं भारतीय महिलेवर ८ वर्ष अत्याचार करून बनवलं गुलाम; समोर आला धक्कादायक प्रकार By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 3:35 PM1 / 9एका भारतीय महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप एका ऑस्ट्रेलियन जोडप्यावर लावण्यात आहेत. या जोडप्यावर लावलेल्या आरोपांनुसार या महिलेला आठ वर्षापर्यंत गुलाम बनवून ठेवण्यात आलं होतं. या जोडप्याच्या घरातून ही महिला गंभीर अवस्थेत दिसून आली. विक्टोरियाच्या सुप्रीम कोर्टात याविरुद्ध बुधवारी ट्रायल होणार आहे.2 / 9या महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिची मानसिक स्थिती फारशी चांगली नव्हती. रिकव्हर होण्यासाठी या महिलेला २ महिने लागू शकतात. मूळची तामिळनाडूची रहिवासी असलेल्या या महिलेचं वजन तीन किलोंपर्यत कमी झालं होतं. तसंच या महिलेला सेप्सिस आणि मधुमेहाच्या आजाराचा सामना करावा लागत होता. 3 / 9या प्रकरणात वकिल रिचर्ड यांनी सांगितले की, महिला तामिळनाडूहून मेलबर्नमध्ये दोनवेळा ऑस्ट्रेलियातील या जोडप्याच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी आली होती. या जोडप्यानं या महिलेला २००७ ते २०१५ पर्यंत गुलाम बनवून ठेवलं होतं. 4 / 9या प्रकरणात वकिल रिचर्ड यांनी सांगितले की, महिला तामिळनाडूहून मेलबर्नमध्ये दोनवेळा ऑस्ट्रेलियातील या जोडप्याच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी आली होती. या जोडप्यानं या महिलेला २००७ ते २०१५ पर्यंत गुलाम बनवून ठेवलं होतं. दरम्यान ऑस्ट्रेलियन व्यक्तीनं आपल्या माऊंट वेवेर्ली घरातून ट्रिपल जिरो क्रमांक डायल केला होता. 5 / 9या जोडप्यावर आरोप लावण्यात आला आहे की, ही महिलेशी वारंवार खोंट बोलण्यात आलं होतं. ही भारतीय महिला कधी कधी या जोडप्यांच्या घरी जात होती. 6 / 9या महिलेनं सुरूवातीला काहीही खरं सांगितलं नव्हतं. पण नंतर तिनं स्वीकार केला की, ऑस्ट्रेलियन जोडप्याकडून शोषण केलं जात होतं या महिलेचा व्हिजा २००७ मध्ये आणि पासपोर्ट २०११ मध्ये संपला होता. त्यानंतर ही महिला ऑस्ट्रेलियात बेकायदेशीरपणे राहत होती. त्यामुळे तिच्या मनात नेहमी भिती असायची, म्हणून या महिलेचं शोषण केलं जात होतं. रिचर्ड यांनी याबाबतीत महिलेचं शोषण झाल्याची तक्रार केली आहे. तिच्या प्राथमिक अधिकारांबाबत छेडछाड झाल्याचे सांगण्यात आले आहे. 7 / 9या महिलेला कुठेही बाहेर पडू दिलं जात नव्हतं. कोणाशी बोलूही दिलं जात नव्हतं. यादरम्यान तिला तिच्या वाढदिवसाला फक्त पाच किंवा दहा डॉलर मिळायचे. तर कोणी साडी द्यायचं या बदल्यात या महिलेला साफ सफाई, जेवण बनवणं, तसंच लहान मुलांचा सांभाळ करावा लागत होता. 8 / 9रिर्चडने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार या महिलेला तिच्या जावयानं ऑस्ट्रेलियात नोकरी मिळवून दिली होती. त्याचवेळी पगाराबाबतही गोष्टी झाल्या होत्या. सुरूवातीच्या काळात घरच्यांशी बोलायला मिळत होतं. पण २०१२ नंतर या महिलेचा आपल्या कुटुंबियांशी असलेला संपर्क पूर्णपणे बंद झाला. 9 / 9जेव्हा या महिलेच्या मुलीनं ऑस्ट्रेलियाई जोडप्याला ई मेल करून या महिलेला भारतात पाठवण्याबाबत विनंती केली तेव्हा या ई मेल्सना शिव्यांचे रिप्लाय आहे. त्यानंतर या महिलेच्या कुटुंबानं ऑस्ट्रेलियाई प्रशासनाशी संपर्क केला आणि सदर प्रकरणाची तपासणी सुरू केली. (प्रातिनिधीक फोटो) आणखी वाचा Subscribe to Notifications