Azeem mansoori small hight : नशिब पालटलं ना राव! 'लग्न लावून द्या' म्हणणाऱ्या आझीमसमोर लागलीये मुलींची रांग; म्हणे अशीच नवरी हवी.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 13:58 IST
1 / 6 उत्तर प्रदेशातील शामलीमधील कैराना येथिल रहिवासी असलेला २ फूट ६ इंचाच्या आझीम मंसूरीचं (Azeem mansoori) नशीब पालटलं आहे. आता या माणसाचे पाय जमिनीवर नाहीत. होय, कारण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून या माणसासाठी खूप स्थळं येत आहेत. 2 / 6एक वेळ अशी होती की, मला लग्नासाठी मुलगी हवीये म्हणून हा माणूस सगळ्यांना विनंती करत होतात. इतकंच नाही तर पोलिसांनाही मला मुलगी शोधण्यास मदत करा असं त्यांनी सांगितलं होतं. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाला आणि त्याचा परिणाम म्हणून आझीम यांच्यासाठी आता मुलींची रांग लागली आहे त्यामुळे ते खूपच खूश आहेत.3 / 6२ फूट ६ इंचाच्या आझीम मंसूरी यांच्या म्हणण्यानुसार त्यांना एका श्रीमंत नाही तर गरिब घरातील मुलीसह लग्न करायचं आहे. ते म्हणतात, ''देवानं मला सांर काही दिलंय. आता फक्त एक अशी मुलगी हवी जी माझी सेवा करेल आणि मी तिची सेवा करू शकेन. 4 / 6जिल्यातील एसपी सुकृती माधव, डीएम आणि माध्यमं मला मुलगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते. मी आता तीन महिन्याच्या आत लग्न करेन. रमजान महिन्याच्या आधी मी लग्न करून माझ्या भावी पत्नीला घेऊन जाईन. मी मौलवी असून पाचवेळचा नमाजी असून साधेपणानं आपलं लग्न करेन. माझ्या कुटुंबातील लोकही लग्न लावण्याच्या प्रयत्नात आहेत.''5 / 6त्यांना गरिबाच्या घरातील एखाद्या मुलीशी लग्न करायचं असून कमी उंचीमुळे मुली मिळण्यात अडथळा येत होता. पण आता मात्र आझीम यांना स्थळांची कमी नाहीये. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे वडील मुलायम सिंह यांनी आझीम मंसुरीला आर्शिर्वाद देत फोटो काढला आहे. 6 / 6अझीमने केलेल्या दाव्यानुसार, स्वत: सलमान खानने त्याला फोन केला. शिवाय त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अझीमने सांगितले, भाईजानने मला स्वत: फोन केला होता. त्यांनी मला मुंबईत बोलवेल, असे म्हटले. मी तुला भेटू इच्छितो. तू मुंबईला ये, मग भेटून बोलो, असे सलमान फोनवर मला म्हणाला.