शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हा म्हणतो मधमाश्या याचा हुकुम ऐकतात, त्याच्या संपूर्ण शरीरावर देतो आश्रय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 7:16 PM

1 / 10
या व्यक्तीचा दावा आहे की, तो मधमाशांच्या राणीला (Queen Bee) घेऊन फक्त त्याच्याच इशाऱ्यावर संपूर्ण तिचं राज्य म्हणजे पोळं अंगावर मिरवतो. मधमाशा त्यांचं ऐकतात म्हणे...
2 / 10
हा माणूस मधमाशांना घाबरत नाही. चक्क खेळवतो. युगांडाच्या नदिसाबा या आदिवासी बांधवाचे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे फिरत आहेत.
3 / 10
नदिसाबा अंगावर कपडे घालत नाही. कायम त्यांच्या अंगावर असंख्य मधमाशा चिटकलेल्या असतात. त्यांचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नदिबासा प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत.
4 / 10
त्यांचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नदिबासा प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. या पद्धतीने हळूहळू मधमाशा या आपल्या मधपोळ्या सोडून नदिबासाच्या शरिरावर येऊन बसतात.
5 / 10
यूट्यूब चैनल एफ्रिमैक्स दिलेल्या माहीतीनुसार युगांडातील काही लोकांंमध्ये मधमाशांना काबुत ठेवण्याची क्षमता असते.
6 / 10
नदिबासा त्यातलेच एक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की शरीरावर मधमाशा पाळल्यानंतरही आजपर्यंत एकाही मधमाशीने त्याला चावलेलं नाही.
7 / 10
नदिसाबा हे लहानपणापासूनच मधमाशी पालन करतात. मधमाशांपासून कसा बचाव करायचा त्यांना चांगलं माहिती आहे.
8 / 10
कान आणि नाक झाकल्यानंतर ते डोळे आणि ओठांवर पेट्रोलियम जेली लावतात. याचमुळे मधमाशा नदिसाबाला फार इजा पोहचवत नाही.
9 / 10
नदिसाबाची ही कला घातक तर आहे. पण या फोटोंना सोशल मीडियावर आवडीने पाहीले जात आहे.
10 / 10
नदिसाबाचं स्वप्न आहे की लोकांनी मधमाशांना आश्रय द्यावा आणि जगाने या दृश्यांना आवडीने बघावं.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके