शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाप रे बाप! १७१ फूट उंचीचा भलामोठा रावण, १८ लाख खर्च करून उभा राहिला, कुठे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 4:03 PM

1 / 10
हरियाणातील पंचकुला जिल्ह्यात १७१ फूट उंचीचा भारतातील सर्वात उंच रावणाचा पुतळा लोकांच्या दर्शनासाठी सज्ज आहे. महिनाभराच्या मेहनतीनंतर तेजिंदर चौहान यांनी ही प्रतिकृती तयार केली आहे. १७७ फुटी रावणाची निर्मिती करणाऱ्या तेजिंदर चौहानने यापूर्वी पाच वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.
2 / 10
पंचकुला जिल्ह्यात रावणाचा देशातील सर्वात उंच आणि मोठा पुतळा तयार झाला आहे. रावणाच्या या पुतळ्याची उंची १७१ फूट आहे. रावणाचा हा पुतळा शेतात उभारण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.
3 / 10
दसऱ्यापूर्वीच १७१ फुटी रावणाच्या दर्शनासाठी सेक्टर ५ शालिमार मैदानावर कुटुंबीयांसह लोक पोहोचू लागले आहेत. लोक १७१ फूट उंच रावणासह स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे सेल्फी घेताना दिसत आहेत.
4 / 10
रावणाचा हा पुतळा बनवणाऱ्या तेजिंदर चौहानने याआधी जगातील सर्वात मोठा रावण बनवण्याचा विक्रम केला आहे. २०१८ मध्ये तेजिंदर चौहान यांनी २१० फुटांचा रावण बनवला होता. त्यानंतर चंदीगडमध्ये २२१ फुटांचा मोठा रावण बनवण्यात आला.
5 / 10
रावणाच्या आधीच्या पुतळ्याच्या तुलनेत यावेळी उंची १७१ फूट आहे. मात्र यावेळी रावणाची तयारी वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मखमली कापडापासून रावणाचा पुतळा तयार करण्यात आला असून तो अतिशय आकर्षक दिसत आहे.
6 / 10
पंचकुलामध्ये २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळ्याची तयारी जोरात सुरू असून यावेळी पंचकुलाच्या सेक्टर ५ शाली मैदानात बांधलेल्या १७१ फूट रावणाचे दहन पाहण्यासाठी चंदीगड, पंचकुला आणि मोहाली येथून लाखो लोक पंचकुलाला पोहोचतील.
7 / 10
यावेळी श्री माता मनसादेवी चॅरिटेबल ट्रस्ट (दसरा कमिटी) आणि श्री आदर्श रामलीला ड्रॅमॅटिक क्लबतर्फे भव्य दसरा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री क्रेनच्या सहाय्याने हा पुतळा लोकांना बघण्यासाठी उभा करण्यात आला.
8 / 10
गेल्या तीन महिन्यांपासून २५ कारागीर रावणाचा पुतळा बनवण्यात गुंतले होते. हा पुतळा तयार करण्यासाठी सुमारे २५ क्विंटल लोखंड, ५०० बांबूचे तुकडे, ३००० मीटर लांब चटई आणि ३५०० मीटर कापडाचा वापर करण्यात आला आहे. १ क्विंटल फायबरपासून रावणाचा चेहरा तयार करण्यात आला आहे.
9 / 10
विशेष म्हणजे या रावणाच्या आत इकोफ्रेंडली फटाके लावण्यात आले आहेत. जे आकर्षणाचे केंद्र आहे. हे खास फटाके तामिळनाडूहून मागवण्यात आले आहेत. त्याशिवाय हा रावण इकोफ्रेंडली असून रिमोटच्या माध्यमातून त्याचे दहन करण्यात येईल.
10 / 10
हा रावणाचा पुतळा बनवण्यासाठी १८ लाख रुपये खर्च करण्यात आले. २२ आणि २३ तारखेला याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार असून २४ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहुर्तावर हजारोंच्या उपस्थितीत रावणाचे दहन करण्यात येईल.
टॅग्स :Dasaraदसरा