Bill Gates is America's biggest farmer his farmland grows potatoes and carrots
बिल गेट्स आहेत अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी? अंतराळातूनही दिसेल इतकी आहे त्यांची शेती By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 10:58 AM1 / 72 / 7लुसियानामध्ये ७० हजार एकर जमिनीवर ते सोयाबिन, कॉर्न, कॉटन आणि तांदळाचं उत्पादन घेतात. नेब्रास्कामध्ये २० हजार एकर आणि वॉशिंग्टनमध्ये १४ हजार एकरावर ते सोयबिनसोबत बटाट्याचं उत्पादन घेतात. हे बटाटे मॅकडॉनल्डला सप्लाय करतात.3 / 7अनेकांना जाणून घेतल्यावर आश्चर्य होतं की, बिल गेट्स यांच्याकडे इतकी जमीन आहे. ते याकडे इन्वेस्टमेंट कमोडीटीच्या रूपात बघत आहेत. ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे अजूनही आपली स्वत:ची जमीन नाही. १९९० पासून आज पिकांच्या किंमती डबल झाल्या आहेत. 4 / 7याबाबत NBC News ला सेंटर फॉर रूरल अफेअर्सचे पॉलिसी डायरेक्टर Johanathan Hladik म्हणाले की, शेतकऱ्यांकडे स्वत:ची जमीन नाही. त्यांच्याऐवजी दुसऱ्याच लोकांनी ती घेतली आहे. माहितीतून समोर आलं की, जर बिल गेट्स यांनी किंवा इतर कुणी शेतीची जमीन घेतली असेल तरी यांची देखरेख शेतकरीच करतील.5 / 7शेती करण्यासाठी ती जमीन त्यांना शेतीच्या मालकाकडून भाड्याने घ्यावी लागेल. यातून जे उत्पन्न जमीन मालकाला मिळतं ते शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही. यावर वातावरणाचा प्रभावही आहे. बिल गेट्स यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, ते शेतीकडे बिझनेससारखं बघतात.6 / 7यावर्षी बिल गेट्स हे वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहेत. यावर्षाच्या सुरूवातील त्यांनी विकसनशील देशांसोबत वॅक्सीन टेक्नीकला न वाटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. 7 / 7बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने समोर येऊन सांगितलं होतं की, वॅक्सीन एक्सेसमध्ये कुणालाही अडथळा निर्माण करण्याचा अधिकार नाही. पण नुकसान झालं होतं. यानंतर बिल आणि मेलिंडा यांनी घटस्फोटाची घोषणा केली. आणखी वाचा Subscribe to Notifications