शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अबब! बिल गेट्स यांनी खरेदी केली ४६०० कोटींची आलिशान यॉट, बघा आतून कशी दिसते!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 1:02 PM

1 / 11
बिल गेट्स यांचं नाव माहीत नसलेलं क्वचितच कुणी सापडेल. ते जगातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. सध्या ते त्यांनी खरेदी केलेल्या एका यॉटमुळे चर्चेत आले आहेत. या सुपरयार्टमध्ये भविष्याची छाप बघायला मिळते. कारण या याटची किंमत ६४५ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार ही किंमत ४६०० कोटी रूपये इतकी होते.
2 / 11
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिल गेट्स यांना सुपरयॉटची आवड आहे. ते उन्हाळ्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी यॉट भाड्याने घेत होते. पण गेल्या डिसेंबरमध्ये त्यांनी 'मोनॅको याट शो' मध्ये ही सुपरयॉट पाहिली आणि खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
3 / 11
ही सुपरयॉट पूर्णपणे इको फ्रेन्डली आहे. कारण ती लिक्विड हायड्रोजनने चालते. या यॉटची लांबी ३७० फूट असून त्यात ५ डेस्क्स आहेत. त्यामुळेच यावर भरपूर जागा आहे.
4 / 11
यात १४ पाहुण्यांसाठी आणि ३१ क्रू मेंबर्ससाठी एक जिम, योगा स्टुडिओ, ब्युटी रूम, मसाज पार्लर आणि मागच्या डेस्कवर कॅस्केडिंग पूल आहे. इतकेच नाही तर यात ४ गेस्ट रूम, २ व्हिआयपी स्टेट रूम आणि १ पॅवेलियन आहे.
5 / 11
सुपरयॉटमध्ये एक सिनेमा थिएटरही आहे. ज्यात २० लोक आरामात बसून सिनेमा एन्जॉय करू शकतात.
6 / 11
मिळालेल्या माहितीनुसार, ही यॉट ३२ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावते.
7 / 11
या सुपरयॉटला Aqua असं नाव देण्यात आलं आहे. याची सर्वात खास बाब म्हणजे यात एकदा इंधन भरल्यावर हे ६४३७ किलोमीटर प्रवास करते.
8 / 11
या यॉटचा पुढचा भाग खासप्रकारे डिझाइन करण्यात आलं आहे. तसेच ही यॉट पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे.
9 / 11
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिल गेट्स यांना ही सुपरयॉट २०२४ मध्ये मिळणार आहे. ही यॉट तयार करणाऱ्या कंपनीने सांगितले की, ही यॉर्ट तयार करण्यासाठी ४ वर्ष लागतील.
10 / 11
ही यॉट एखाद्या महालाप्रमाणे आलिशान आहे यात फोटो पाहून जराही शंका राहत नाही.
11 / 11
आता जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे म्हटल्यावर या यॉटची किंमत त्यांच्यासाठी काही नाही. पण खरंच यॉर्ट भारीच आहे.
टॅग्स :Bill Gatesबिल गेटसJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स