bizarre jobs people actually do for a living
अजब नोकऱ्या! वाचाल तर चक्रावून जाल By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 1:18 PM1 / 8सीट फिलर्स- पुरस्कार सोहळ्यातील खुर्च्या रिकाम्या राहिल्या, तर टाळ्या कोण वाजवणार? त्यामुळेच रिकाम्या खुर्च्यांवर बसवण्यासाठी काही लोकांना बोलावलं जातं. त्यांना सीट फिलर्स असं म्हणतात. 2 / 8पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर- हॉरर चित्रपटांमध्ये भूत शोधणाऱ्या व्यक्ती दाखवल्या जातात. खऱ्याखुऱ्या जगातही अशी माणसं असतात. त्यांना पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर म्हटलं जातं. 3 / 8मॅट्रेस टेस्टर- काही माणसांची झोप कधीच पूर्ण होत नाही. अशी माणसं मॅट्रेस टेस्टर म्हणून काम करु शकतात. मॅट्रेसवर झोपून ते किती आरामदायक आहे, याचा अहवाल कंपनीला देण्याचं काम ही मंडळी करतात. 4 / 8पार्टी प्लानर- पार्टीचं उत्तम नियोजन करणारी एकतरी व्यक्ती प्रत्येक ग्रुपमध्ये असते. अशी व्यक्ती पार्टी प्लानर म्हणून काम करु शकते. यामधून चांगलं उत्पन्नदेखील मिळतं. 5 / 8मिस्ट्री शॉपर- शॉपिंग करायची आणि त्याचे पैसेही मिळणार, असं काम कुणाला आवडणार नाही? अशी शॉपिंगप्रेमी मंडळी मिस्ट्री शॉपर म्हणून काम करु शकतात. शॉपिंग करताना मिळणारी सेवा कशी आहे, हे पाहणं या व्यक्तींचं काम असतं. 6 / 8पांडा केअरटेकर- पांडा म्हणजे चालता फिरता टेडी बेयर. त्याच्यासोबत वेळ घालवणं अनेकांना आवडेल. तुम्हालाही पांडा आवडत असेल, तर तुम्ही पांडा केयरटेकर म्हणून काम करु शकता. 7 / 8नेल पॉलिश नेमर- नेल पॉलिशची अजब नावं पाहून तुमच्या मनाला कायम प्रश्न पडत असेल, ही नावं ठेवतं तरी कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे नेल पॉलिश नेमर. वेगवेगळ्या नेल पॉलिशला वेगवेगळी नावं देण्याचं काम ही मंडळी करतात. 8 / 8बॉयफ्रेंड ऑन रेंट- टोकियोतील रेंटल बॉयफ्रेंड नावाच्या कंपनीनं एक खास सेवा सुरू केली आहे. ही कंपनी मुलींना बॉयफ्रेंड रेंटवर देते. अनेक मुलं या कंपनीच्या संपर्कात आहेत. कंपनीची सेवा घेणाऱ्या मुलींना डेट करण्याचे पैसे या मुलांना मिळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications