Bizarre lawsuits that will make you crazy and laugh
कोर्टातील 'या' ६ केसेस वाचून हसावं की रडावं हे कळणार नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 1:06 PM1 / 7जगभरातील वेगवेगळ्या कोर्टांमध्ये कोट्यवधी केसेस प्रलंबित आहेत. अनेक खोट्या केसेसमुळेही कोर्ट वैतागलेले आहेत. कारण यात त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहेत. आम्ही तुम्हाला जगातल्या अशाच काही केसेसबाबत सांगणार आहोत, जे वाचून तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही.2 / 7पतीने पत्नीकडून परत मागितली किडनी - २००१ मध्ये सर्जन असलेले डॉक्टर डॉ. रिचर्ड बतिस्ता ने आपली एक किडनी पत्नीची एक किडनी खराब झाल्याने तिला दिली होती. पण २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. डॉ. रिचर्डने आरोप लावला की, त्यांच्या पत्नीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीने डॉ. रिचर्डवर मुलांना भेटण्यास बंदी केली. त्यामुळे डॉ. रिचर्डने घटस्फोटीत पत्नीवर खटला दाखला केला. आणि त्यांनी आपली तिला दिलेली किडनी परत मागितली. असं करणं शक्य नसल्याचं डॉक्टरांनी सांगतिलं. तेव्हा डॉ. रिचर्डने पत्नीकडे १.५ मिनियन डॉलरची नुकसान भरपाई मागितली आहे. 3 / 7वर्गात झोपेतून उठवलं म्हणून शाळेवर केस - विनीसियस रोबाकर नावाच्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने आणि त्याच्या आई-वडिलांनी डनबरी हायस्कूल विरोधात केस दाखल केली आहे. रोबाकर वर्गात डेस्कवरच झोपला होता. नंतर शिक्षिकेने त्याला हातावर मारत जागं केलं. मुलाच्या वडिलांनी दावा केला आहे की, शिक्षिकेच्या मारण्याने मुलाच्या कानाला इजा झाली. आता त्याला ऐकायलाही येत नाही. अजूनही ही केस कोर्टात सुरु आहे. 4 / 7शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने केस - जर्मनीचा एक अभिनेता आणि स्वयंघोषित प्लेबॉय रॉल्फ इडन याने एका १९ वर्षीय तरुणीवर केस केली आहे. ७७ वर्षीय रॉल्फने म्हटले आहे की, या तरुणीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. तसेच या तरुणीने त्याला म्हातारा म्हटलं. रॉल्फने याचिकेत म्हटले आहे की, तरुणीने म्हातारा म्हणणे म्हणजे मला अपमानित करणे आहे. अशं करणं वयावरुन भेदभाव करण्यासारखं आहे. पण काही दिवसांनी रॉल्फने आपली केस मागे घेतली. 5 / 7कुरुप मुलांना जन्म दिल्याने पतीकडून पत्नीवर केस - उत्तर चीनमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर कुरुप मुलांना जन्म दिला म्हणून केस ठोकली आहे. फेंक जियान नावाच्या या व्यक्तीचं म्हणणं आहे की, पत्नीने त्याला न सांगता प्लास्टिक सर्जरी केली होती. जेव्हा मुलांचा जन्म झाला, तेव्हा फेंगला वाटलं की, पत्नीचं दुसऱ्या कुणासोबत अफेअर आहे. पण डिएनए टेस्टमध्ये मुल त्याचंच असल्याचं सिद्ध झालं. वाद वाढला तेव्हा पत्नीने मान्य केलं की, तिने १ लाख डॉलर खर्च करुन चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली होती. कोर्टाने पत्नीला आदेश दिला की, पतीला १ लाख २० हजार डॉलर नुकसान भरपाई म्हणून द्यावे. 6 / 7कैद्याने स्वत:वर केली केस - १९९५ मध्ये रॉबर्ट ली ब्रॉक नावाच्या कैद्याने स्वत:वरच केस केली आहे. वर्जिनियाच्या इंडियन क्रीक करेक्शनल सेंटर(तुरुंग) मध्ये असलेल्या रॉबर्टने दावा केला आहे की, अटक करुन घेऊन त्याने स्वत: मानवाधिकारांचं उलंघन केलं आहे. ७ पानांच्या याचिकेत त्याने स्वत:वर ५ मिनियन डॉलरची केस केली आहे. त्याने सरकारला सांगितले आहे की, ही रक्कम त्यांनी भरावी. कारण रॉबर्ट काही कमवत नाही. पण न्यायाधीशांनी ही याचिका फेटाळली.7 / 7दुकानदारांनी बेघरांवर केली १ मिनियन डॉलरची केस - न्यू-यॉर्कमध्ये हाय-एंड कॅम्प एंड असोसिएटेड एंटिक्स नावाने एक दुकान आहे. या दुकानाचा मालक कार्ल केम्पने तीन बेघरांवर १ मिलियन डॉलरची केस केली आहे. त्याने आरोप केलाय की, हे तीन लोक त्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांकडे एकसाखरे बघतात आणि त्यांना घाबरवतात. तसेच हे लोक दुकानासमोरच लघवी करतात. पण कोर्टाने ही याचिकाही फेटाळली. आणखी वाचा Subscribe to Notifications