Bizarre ritual bride father gift 21 snakes as dowry to groom
बोंबला! 'इथे' लग्नात जावयाला हुंडा म्हणून दिले जातात 21 विषारी साप, त्याशिवाय होतंच नाही लग्न! By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 4:24 PM1 / 9मुलीच्या लग्नात साधारणपणे प्रत्येक बाप आपल्या मुलीच्या आनंदासाठी स्वखूशीने पैशांपासून ते गाडीपर्यंत भेट जावयाला देतो. पण तुम्ही कधी ऐकलंय का की, एखाद्या नवरदेवाला विषारी साप भेट दिले असतील. नाही ना? पण असा रिवाज भारतातील एका भागात आहे.2 / 9नवरदेवाला लग्नात चक्क विषारी साप देण्याची प्रथा मध्य प्रदेशातील एका विशेष समाजात आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा आजही इथे पाळली जाते. चला या अनोख्या प्रथेबाबत जाणून घेऊ...3 / 9मध्य प्रदेशातील गौरिया समुदायातील लोक आपल्या जावयाला हुंड्यात तब्बल 21 विषारी साप देतात. या समुदायात ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे.4 / 9अशी मान्यता आहे की, जर या सुमदायातील एखाद्या व्यक्तीने जर त्याच्या मुलीच्या लग्नात जावयाला साप दिले नाही तर, त्याच्या मुलीचं लग्न लवकर तुटतं.5 / 9असे सांगितले जाते की, मुलीचं लग्न जुळताच वडील जावयाला भेट देण्यासाठी साप पकडणे सुरू करतो. यात अनेक विषारी साप असतात. 6 / 9आश्चर्याची बाब म्हणजे या समुदायातील लहान मुले बालपणापासूनच सापांसोबत खेळतात. त्यांना जराही भीती वाटत नाही. 7 / 9या समुदायातील लोकांना मुख्य व्यवसाय ह साप पकडने हाच आहे आणि ते लोकांना साप दाखवून पैसे कमावतात.8 / 9हेच कारण आहे की, वडील जावयाला हुंड्यात साप देतो. जेणेकरून जावई सापांच्या माध्यमातून पैसे कमावू शकेल आणि परिवाराचं पोट भरू शकेल. 9 / 9हेच कारण आहे की, वडील जावयाला हुंड्यात साप देतो. जेणेकरून जावई सापांच्या माध्यमातून पैसे कमावू शकेल आणि परिवाराचं पोट भरू शकेल. आणखी वाचा Subscribe to Notifications