शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील ‘असं’ एक गाव जे रातोरात कोट्यधीश बनले; १, २ नव्हे तर ३१ कुटुंब श्रीमंत झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 2:32 PM

1 / 10
आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्यांच्याकडे कधीही पैशांची कमी भासू नये. ते कोट्यधीश होऊदे. यासाठी लोकं दिवसरात्रं मेहनत घेत असतात. अनेक लोकं पूर्ण आयुष्य प्रचंड मेहनत घेत असतात. परंतु कधीही कोट्यधीश बनू शकत नाहीत.
2 / 10
पण अरुणाचलमधील एक गाव असं आहे ज्याठिकाणी एक कुटुंब नव्हे तर गावात राहणारे ३१ कुटुंब रातोरात कोट्यधीश बनले. आता ३१ कुटुंब नेमकं कोट्यधीश कसे बनले? या गावात असं काय घडलं? हा विचार तुमच्याही मनात पडला असेल. तर त्यांचं उत्तर जाणून घेऊया
3 / 10
अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात बोमजा(Bomja Village) नावाचं एक गाव आहे. याठिकाणी २०१८ पूर्वी या गावातील गावकऱ्यांची अवस्था इतर गावातल्या लोकांप्रमाणेच होती. परंतु ७ फेब्रुवारी २०१८ मध्ये हे गाव कोट्यधीश लोकांचं गाव बनलं.
4 / 10
भारतीय लष्करानं तमांग गैरिसन यूनिट निर्माणासाठी बोमजा गावातील जवळपास २००.५६ एकर जमीन अधिग्रहण केली. हे गाव चीनच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे पूर्वोत्तरमध्ये भारतीय सशस्त्र दलासाठी हे धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे.
5 / 10
त्यामुळे या गावाची जमीन ताब्यात घेण्याचा निर्णय लष्कराने घेतला होता. २०१३ मध्येच जमीन संपादित करण्यात आली असली तरी २०१८ मध्ये पाच वर्षांनी नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यात आली. अरुणाचल प्रदेशातील बोमजा गावातील लोकांना मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी स्वतःच्या हाताने धनादेशाचे वाटप केले होते.
6 / 10
यासोबतच सीएम खांडू यांनीही त्यावेळी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली होती. या गावातील ३१ कुटुंबांच्या २००.०५६ एकर जमिनीच्या संपादनाच्या बदल्यात संरक्षण मंत्रालयाकडून ४०.८ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
7 / 10
यापैकी २९ कुटुंबांना १.०९ कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला, तर एका कुटुंबाला २.४५ कोटी आणि अन्य कुटुंबाला ६.७३ कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यामुळे बोमजा गावातील गावकऱ्यांना मिळालेली कोट्यधीश रक्कमेचा चेक पाहून सगळेच आनंदित झाले.
8 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, जमिनींच्या मोबदल्याची रक्कम लवकर देण्यासाठी केंद्र सरकारच्या संपर्कात होते. सोबतच, बराच काळ रखडलेली ही भरपाई रक्कम मंजूर केल्याबद्दल त्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचेही आभार मानले होते.
9 / 10
वृत्तानुसार, नुकसान भरपाईची रक्कम मिळाल्यानंतर तवांग जिल्ह्यातील बोमजा गाव आशियातील सर्वात श्रीमंत गावांच्या यादीत सामील झाले होते. एवढी मोठी रक्कम मिळाल्याने गावातील लोक खूप खूश झाले आणि यावेळी खूप आनंदी जीवन जगत आहेत.
10 / 10
कोणीतरी अगदी बरोबरच म्हटले आहे की, जगात कधी, कुठे आणि कसे नशीब बदलेल हे कोणालाच माहीत नाही. चीन सीमेच्या अगदी जवळ असलेल्या बोमजा गावातील गावकऱ्यांसोबतही असेच घडले. भारतीय लष्कराची नजर या गावाकडे गेली आणि त्यांना याठिकाणी जमीन संपादन केली.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवान