शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अवघ्या 100 रुपयांत खरेदी केले भंगार विमान, आता एका तासाला करतो लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 4:11 PM

1 / 9
असे म्हणतात की ज्याला पैसे कसे कमवायची अक्कल आहे, तो भंगारातूनही पैसे कमावतो. तुम्ही अनेक किस्से ऐकले किंवा पाहिले असतील ज्यात लोक भंगार वस्तुतून कोट्यधीश होतात.
2 / 9
अशीच एक भाग्यवान व्यक्ती सध्या चर्चेत आली आहे. इंग्लंडमधील एका व्यक्तीने अवघ्या 100 रुपयांत वापरात नसलेले ब्रिटिश एअरवेजचे जेट 747 विकत घेतले. पण आज तो जगातील पहिला प्लेन पार्टी आयोजित करणारा व्यक्ती बनला आहे.
3 / 9
अवघ्या शंभर रुपयांत घेतलेल्या विमानाचे रिनोव्हेशन करुन त्या व्यक्तीने हे विमान पार्टी करण्यासाठी किरायाने देण्याचे काम सुरू केले आहे. लोक इथे पार्टी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात.
4 / 9
ब्रिटीश एअरवेजचे हे पार्टी विमान सध्या इंग्लंडच्या कॉट्सवोल्ड्स या खाजगी विमानतळावर आहे. हे विमाना पार्टीसाठी भाड्याने दिले जाते. या विमानाला आतून आलिशान लुक देण्यात आला आहे.
5 / 9
या विमानाला पार्टी प्लेन नाव देण्यात आले असून, अनेक श्रीमंत लोक या ठिकाणी पार्टी करण्यासाठी मोठी रक्कम देतात. या ठिकाणी वाढदिवस, कॉर्पोरेट किंवा इतर मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते.
6 / 9
रिनोव्हेशननंतर या भंगार विमानाला आलीशान लूक देण्यात आला आहे. हे विमान कोरोनाच्या काळात निवृत्त झाले होते. यानंतर 2020 मध्ये अवघ्या शंभर रुपयांना विकले गेले. विमानतळाच्या मुख्य कार्यकारी सुसाना हार्वे यांनी ते विकत घेतले आहे.
7 / 9
सुसैनाला या विमानाचा अभिमान आहे. त्यांनी फक्त 1 युरो म्हणजेच शंभर रुपयांत हे विमान खरेदी केले आणि रिनोव्हेशनसाठी पाच कोटी रुपेय खर्च केला. पण, आता या विमानासाठी लोक लाखो रुपये मोजायला तयार आहेत.
8 / 9
या विमानात जाताच तुम्ही पार्टीच्या मूडमध्ये जाल. विमानात एक मोठाबार देखील आहे. तसेच, आरामदायी खुर्च्या आणि रोषणाईच्या माध्यमातून येथील वातावरण रंगीबेरंगी करण्यात आले आहे.
9 / 9
हे विमान 15 फेब्रुवारी 1994 रोजी ब्रिटिश एअरवेजमध्ये सामील झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत 13 हजार 398 उड्डाणे झाली आहेत. या विमानाचे शेवटचे उड्डाण 6 एप्रिल 2020 झाली होती, त्यानंतर विमान निवृत्त झाले. आता पार्टीसाठी एका तासाचे भाडे एक लाख रुपये आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स