Brazil man visits doctor for lower back pain discovers he has three kidneys api
कंबरदुखीची समस्या घेऊन डॉक्टरकडे गेला, सीटी स्कॅनमधे जे दिसलं ते पाहून डॉक्टर चक्रावले! By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 2:01 PM1 / 9अनेकदा आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडतात की, आपल्यालाच त्यावर विश्वास बसत नाही. कधी कधी तर असं काही होईल याचा विचारच काय कल्पना देखील केलेली नसते. 2 / 9अशीच एक आश्चर्यकारक घटना एका व्यक्तीसोबत घडली. या व्यक्तीला लोअर बॅक पेन म्हणजेच कंबरदुखीची समस्या होती. 3 / 9सामान्यपणे बसून काम करणाऱ्यांना ही समस्या होतेच. ब्राझील साओ पाउलोमधील ही व्यक्ती कंबरदुखीची समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरकडे गेली. 4 / 9मात्र, डॉक्टरांनी जेव्हा त्याचा सीटी स्कॅन काढला तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून तेही थक्क झाले.5 / 9इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही 38 वर्षीय व्यक्ती कंबदुखीच्या समस्या घेऊन डॉक्टरकडे गेली. काही दिवसांपासून त्याचा त्रास वाढला होता. त्याने सीटी स्कॅन केलं. (सांकेतिक छायाचित्र)6 / 9स्लिप डिस्कची तर समस्या नाही हे जाणून घेण्यासाठी त्याने सीटी स्कॅन केलं. यात स्लिप डिस्क तर नाही पण चक्क व्यक्तीला तीन किडनी असल्याचं दिसून आलं. हा प्रकार पाहून डॉक्टरही हैराण झाले.7 / 9सीटी स्कॅनने डॉक्टरांना चक्रावून सोडलं होतं. कारण त्यांनी अशी केस कधी पाहिली नव्हती. त्यांना दिसलं की, व्यक्तीच्या उजव्या बाजूला दोन किडनी आहेत. तर डाव्या बाजूला एक किडनी. म्हणजे या व्यक्तीला एकूण तीन किडनी आहेत.8 / 9सामान्यपणे अशी केस तेव्हा समोर येते जेव्हा एखादा अपघात होतो किंवा डायग्नोसिसच्या माध्यमातून हे समोर येतं. 9 / 9सध्या या व्यक्तीला लोअर बॅक पेनचं औषध देण्यात आलं आहे. मात्र, तीन किडनी असणं ही एक फार दुर्मीळ गोष्ट आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications