शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' गावातील लोकांना आहे दुर्मिळ आजार, उन्हात जाताच त्वचा वितळते; जाणून घ्या धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 1:05 PM

1 / 5
साओ पाउलो: मानवासाठी सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे. सूर्यप्रकाशाशिवाय जीवनाची कल्पना करता येत नाही. पण, पृथ्वीवर असं एक गाव आहे, जिथे लोक उन्हात घराबाहेर पडायला घाबरतात. विश्वास ठेवणे कठीण असले तरी हे सत्य आहे. ब्राझीलमधील साओ पाउलो येथे असलेल्या अरारस गावात राहणारे लोक दिवसा घराबाहेर पडण्यास घाबरतात. याचे कारण म्हणजे, उन्हात घराबाहेर पडल्यावर येथील लोकांची त्वचा भाजून निघते आणि हळुहळू वितळू लागते. तुम्हाला वाचून धक्का बसला असेल, पण हे खरं आहे.
2 / 5
विचित्र रोगाने ग्रस्त- अरारस गावातील लोक दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहेत. या आजाराचे नाव झेरोडर्मा पिगमेंटोसम(Xeroderma Pigmentosum) आहे. या आजारात सूर्यप्रकाशामुळे त्वचा जळते. हा आजार लाखो लोकांपैकी फक्त 3 टक्के लोकांना होतो. या आजाराने त्रस्त लोकांसाठी उन्हात फिरणे एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाही. जेव्हा हा रोग खूप वाढतो तेव्हा तो त्वचेचा कर्करोगही होतो. त्यानंतर याचा उपचार करणे खूप कठीण होते.
3 / 5
या आजारात काय होतं ?- या गावातील बहुतांश लोकांना हा झरोडर्मा पिगमेंटोसम आजार आहे. या आजारामध्ये आजारी व्यक्तीची उन्हामुळे त्वचा लाल आणि कोरडी पडते. याशिवाय, अति उष्णतेमुळे त्वचा वितळलेल्या प्लास्टिकप्रमाणे कुरुप दिसू लागते. या गावात आजार वाढण्याचे कारण म्हणजे, गावातील बहुतांश लोक शेतीशी संबंधित व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना दिवसा घराबाहेर पडावंच लागतं. घरबाहेर पडल्यावर उन्हाचे चटके बसतात आणि त्वचा खराब होते.
4 / 5
अनुवांशिक रोग किंवा देवाची शिक्षा- रिपोर्टनुसार अरारस गावाची लोकसंख्या 1 लाख 36 हजारांच्या जवळपास आहे. येथे 600 हून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत. या आजारामुळे येथील नागरिकांचे जगणे कठीण होत आहे. या आजारामागे आनुवंशिकता हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जाते. पण, काही लोक याला लैंगिक आजार मानतात तर काही लोकांच्या मते ही देवाने दिलेली शिक्षा आहे.
5 / 5
लोकांमध्ये जागरूकता वाढवणे- मागील अनेक वर्षांपासून येथील लोक या आजाराने त्रस्त आहेत. सुरुवातीला या आजाराबद्दल विविध अंधश्रद्धा होत्या. पण, आता हलुहळू येथील लोक या आजाराबद्दल जागरुक होत आहेत. लोकांना या आजाराची जाणीव झाली असून मुलांना त्याची सुरुवातीची लक्षणे सांगितली जात आहेत. तसेच, या आजारापासून वाचण्यासाठी उपायही केले जात आहेत.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके