the bride goes to sasural in helicopter in up pratapgarh
या वधुचा थाटच निराळा! गाडी, घोेडे नाही तर चक्क हॅलिकॉप्टरमधुन पाठवणी, पाहा photos By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 6:03 PM1 / 10उत्तर प्रदेशमधील एका अनोळख्या पाठवणीची सध्या चर्चा सुरू आहे. UP मधील प्रतापगड याठिकाणी वधूची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधून करण्यात आली. 2 / 10वडिलांनी आपली लाडकी मुलगी उर्वशी सिंहला हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवले आहे.3 / 10सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. जवळपास दररोज लग्नातील विविध किस्से ऐकायला मिळतात. भारतीय लग्नांमध्ये मोठा खर्च देखील केला जातो. 4 / 10आई-वडील देखील मुलांसाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये पाहायवला मिळाला. एका वडिलांनी त्यांच्या मुलीची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधून केली आहे.5 / 10नगर कोतवालीच्या सराईसागर गावात हा विवाहसोहळा पार पडला.6 / 10विनोद सिंह यांची मुलगी उर्वशी सिंह हिचा विवाह लालगंजमधील अर्जुनपूर याठिकाणी राहणाऱ्या अमित सिंहसोबत झाला. लग्नासाठी वरातीचा थाटही मोठा होता.7 / 10शनिवारी सकाळी ११ वाजता मुलीच्या वडिलांनी तिला हेलिकॉप्टरमध्ये बसवून नवऱ्याच्या घरी पाठवले.8 / 10हेलिकॉप्टरमधून जाणाऱ्या या पाठवणीचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ जमले होते.9 / 10११ वाजता हेलिपॅडवरून उड्डाण करून नववधू १५ मिनिटांत अर्जुनपूर येथील तिच्या सासरी पोहोचली.10 / 10वराचे वडील कमल सिंह सांगतात की, वधूच्या वडिलांनी लग्नात काहीतरी खास करायचं मनाशी ठरवलं होतं. लग्नात सरप्राईज म्हणून त्यांनी मुलीला हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवलं. आणखी वाचा Subscribe to Notifications