Bride refused to apply vermilion groom not like broke the marriage in Ranchi
एकमेकांना हार घातले, सप्तपदीही झाली अन् ऐनवेळी लग्नाच्या मंडपातून उठून गेली नवरी, कारण.... By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 11:05 AM1 / 9भारतात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. अशात दररोज लग्नातील काहीना काही विचित्र घटना समोर येत आहेत. काही कारणांनी वरात परत गेल्याच्या किंवा लग्न तुटल्याच्या घटना घडत आहेत. 2 / 9अशात झारखंडच्या रांचीमध्ये एक अजब घटना घडली आहे. इथे भांगेत कुंकू भरणार इतक्यात नवरी मंडपातून निघून गेली. ज्यानंतर मंडपात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर वरातीत आलेले पाहुणे नवरीच्या घरासमोर धरणं देऊन बसले. 3 / 9रांचीच्या धुर्वामधील ही घटना आहे. इथे एका लग्नात ऐनवेळी गोंधळ झाला जेव्हा नवरी मंडपातून उठून गेली आणि तिने लग्नास नकार दिला. 4 / 9यानंतर नवरदेवाकडील लोक नवरीच्या घरासमोरच धरणं आंदोलन करायला बसले. त्यांनी मागणी केली की, एकतर नवरीने नवरदेवासोबत लग्न करून त्याच्या घरी जावं नाही तर लग्नात झालेला खर्च नवरीकडील लोकांनी परत द्यावा.5 / 9लग्नास नकार दिल्यानंतर नवरी आणि नवरदेवाकडील लोकांनी पुन्हा पुन्हा मुलीला आपला निर्णय बदलण्यास सांगितले. पण ती काही ऐकली नाही. नवरी म्हणाली की, ती तिचा निर्णय बदलू शकत नाही. ती कोणत्याही परिस्थिती लग्न करणार नाही.6 / 9रांचीच्या मांडर भागात राहणाऱ्या विनोद लोहराचं लग्न धुर्वाची राहणारी चंदा लोहरासोबत ठरलं होतं. गेल्या २९ जूनला विनोद वरात घेऊन चंदाच्या घरी पोहोचला. आधीच ठरलेल्या कार्यक्रमानुसार, लग्नाचे सर्व रितीरिवाज सुरू झाले. 7 / 9दोघांनी एकमेकांना हारही घातले आणि सप्तपदीही घेतली. पण जेव्हा भांगेत कुंकू भरण्याची वेळ आली तेव्हा नवरी मंडपातून उठून गेली.8 / 9नवरी अचानक मंडपातून उठून गेल्याने एकच खळबळ उडाली. नवरी तिच्या आई-वडिलांना म्हणाली की, तिला लग्न करायचं नाहीये, कारण तिला मुलगा पंसंत नाही.9 / 9याप्रकरणी मुलीचे वडील जगदीश लोहरा म्हणाले की, मुलगी लग्नासाठी तयार नाही आणि मुलाकडे लोक लग्नात झालेला खर्च परत मागत आहेत. पण त्यांच्याकडे पैसे नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications