Bromo volcano ganesh temple in Indonesia
इथे धगधगत्या ज्वालामुखीच्या टोकावर 700 वर्षांपासून केली जाते भगवान गणेशाची पूजा, रोमांचक इतिहास वाचून व्हाल अवाक्... By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 1:25 PM1 / 9इंडोनेशियामध्ये सध्या एकूण 141 ज्वालामुखी आहेत. ज्यातील 130 ज्वालामुखी सक्रिय आहेत आणि यांमध्ये कधीही स्फोट होत राहतात. यातीलच एक आहे माउंट ब्रोमो डोंगरावरील ज्वालामुखी. या ज्वालामुखीची आश्चर्यजनक बाब म्हणजे याच्या टोकावर एक गणेसाचं मंदिर आहे. असे मानले जाते की, या गणेशामुळेचे येथील लोक सुरक्षित आहेत. (All Image Credit : Social Media)2 / 9माउंट ब्रोमोचा अर्थ स्थानिक भाषेत ब्रम्हा असा होतो. पण हे मंदिर गणेशाचं आहे. स्थानिकांचं असं मत आहे की, येथील मूर्ति 700 वर्षांपासून तिथेच आहे. जी त्यांच्या पूर्वजांनी स्थापित केली होती. मान्यतांनुसार, हीच गणेशाची मूर्ती ते ज्वालामुखीच्या इतक्या जवळ असूनही त्यांची रक्षा करत आली आहे. 3 / 9हेच कारण आहे की, येथील एक समाज ज्याला Tenggerese नावाने ओळखलं जातं ते अनेक वर्षांपासून श्री गणेशाची पूजा करतात. या गणेशाच्या मंदिराला Pura Luhur Poten च्या नावाने ओळखले जाते. 4 / 9या मंदिराची खासियत म्हणजे इथे गणेशाच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत आणि या सर्व मूर्ती ज्वालामुखीच्या गोठलेल्या लाव्हारसापासून तयार झाल्या आहेत.5 / 9माउंट ब्रोमोच्या आजूबाजूला जवळपास 30 गावे आहेत आणि यात या समाजाचे जवळपास 1 लाख लोक राहतात. हे लोक स्वत:ला हिंदू मानतात आणि ते हिंदू संस्कृती फॉलो करतात. पण काळानुसार त्यांच्या रितीरिवाजात काही बौद्ध रिवाजही जुळले गेले आहेत. जसे की, ते गणेश, ब्रम्हा आणि विष्णूसोबत बुद्धाचीही पूजा करतात.6 / 9Tenggerese समाजातील लोक दरवर्षी 14 दिवसांसाठी माउंट ब्रोमो डोंगरावरील गणेशांची पूजा करतात. या पूजेला Yadnya Kasada असं म्हटलं जातं. असे मानले जाते की, 13व्या ते 14 व्या शतकादरम्यान याची सुरूवात झाली होती. 7 / 9याबाबत एक लोककथा आहे ज्यानुसार, देवाने येथील अपत्य नसलेल्या राजा-राणीला 24 अपत्ये दिली. अट ही होती की, 25 वं आणि शेवटं अपत्य ते डोंगराला अर्पण करतील. त्यानंतर दरवर्षी पूजेचा सिलसिला सुरू झाला. आजही इथे बकऱ्यांची बळी दिला जातो.8 / 9सोबतच ज्वालामुखीच्या या बळीसोबत फळं-फूलं आणि भाज्याही अर्पण केल्या जातात. मान्यता आहे की, गणेशाची पूजा केल्याने आणि धगधगत्या ज्वालामुखीत फळं टाकल्याने विस्फोट टाळला जातो आणि असं केलं नाही तर हा समाज नष्ट होऊ शकतो.9 / 9या जमातीच्या लोकांचं एक वेगळं कॅलेंडर आहे. या कॅलेंडरनुसार दरवर्षी 14 दिवसांसाठी ही पूजा केली जाते. यादरम्यान इथे जत्रा असते. या जत्रेत अनेक परदेशी पर्यटकही सहभागी होता. पण ज्वालामुखीमुळे येथील तापमान अधिक राहतं. त्यामुळे श्वास घेण्यास समस्या असणाऱ्या पर्यटकांना इथे येण्यास मनाई केली जाते. येथील पूजा हिंदू संस्कृतीप्रमाणे केली जाते. इथेही पूजारी असतात आणि पुजाऱ्याचा मुलगाच पूजारी होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications