शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bullet Train on Moon: ना रॉकेट, ना स्पेसशिप; चक्क बुलेट ट्रेनने चंद्राचा प्रवास, जपानने आखली योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 7:28 PM

1 / 8
Japan Bullet Train on Moon: जपानकडे इतर कुठल्याही देशापेक्षा प्रगत तंत्रज्ञान असल्याचे म्हटले जाते. आता आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर जपान असे काम करणार आहे, ज्याची कोणत्याही देशाने कल्पना केली नसेल. जपान पृथ्वीवरुन थेट चंद्रावर जाणारी बुलेट ट्रेन तयार करत आहे. एवढ्यावरच न थांबता, या कामात यश मिळाल्यानंतर मंगळावरही ट्रेन नेण्याचा विचार आहे.
2 / 8
एकीकडे अमेरिका पुन्हा चंद्रावर जात आहे, तर दुसरीकडे चीन मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्यात व्यस्त आहे. यासोबतच रशिया चीनसोबत चंद्रावर संयुक्त मोहिमेची योजना आखत आहे. अशा परिस्थितीत जपान यां देशांच्याही पुढे गेला असून, चक्क बुलेट ट्रेन चंद्रावर नेण्याच्या योजनेवर काम करत आहे.
3 / 8
इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, जपान मंगळावर एक काचेचे निवासस्थान तयार करण्याचा विचार करत आहे. काचेचे निवासस्थान म्हणजेच मानव एका कृत्रिम अवकाश निवासस्थानात राहतील, ज्याचे वातावरण पृथ्वीसारखे असेल.
4 / 8
कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणी स्नायू आणि हाडे कमकुवत होतात, त्यामुळे या कृत्रिम अवकाश निवासस्थानात गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीसारखे वातावरण तयार केले जाईल.
5 / 8
जपानला या योजनेत यश आले तर मानवासाठी दुसऱ्या ग्रहावर राहण्याचा पर्याय खुला होईल. काचेच्‍या(Glass) निवासस्थानाच्‍या बाहेरचे जीवन लोकांसाठी कठीण असेल, त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी लोकांना स्पेससूट घालावे लागतील. मंगळावर राहण्याची कल्पना करणे अजूनही कठीण प्रश्न आहे.
6 / 8
शास्त्रज्ञांच्या मते, 21व्या शतकाच्या उत्तरार्धात मानव चंद्र आणि मंगळावर राहण्यास सक्षम असेल. त्याचा प्रोटोटाइप 2050 पर्यंत तयार होईल आणि अंतिम आवृत्ती तयार होण्यासाठी जवळपास एक शतक लागू शकेल.
7 / 8
क्योटो विद्यापीठ आणि काजिमा कन्स्ट्रक्शन सोबत मिळून या स्पेस एक्सप्रेस (Space Express) नावाच्या बुलेट ट्रेनवर एकत्र काम करणार आहेत.
8 / 8
ही ट्रेन पृथ्वीवरून चंद्र आणि मंगळावर धावणार आहे. ही इंटरप्लॅनेटरी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम (Interplanetary Transportation System) असेल, जी हेक्झाट्रॅक(Hexatrack) म्हणून ओळखली जाईल.
टॅग्स :JapanजपानBullet Trainबुलेट ट्रेनJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय