Bunch of red grapes Ruby Roman sold for Rs 75 lakh at Japanese auction
बापरे! 24 लाल द्राक्षांचा गुच्छ विकला 7.5 लाख रुपयांना... By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 2:50 PM1 / 6जपानमध्ये 24 लाल द्राक्षांचा एक गुच्छाची किंमत जवळपास 7.5 लाख रुपये इतकी झाली आहे. खास जातीच्या या एका द्राक्षाचे वजन 20 ग्रॅम असते. 2 / 6येथील सरकारने 12 वर्षांपूर्वी इशिकावा प्रांतात या जातीचे द्राक्षे विकसीत केले होते. खासकरुन, ही द्राक्षे श्रीमंतांची फळे म्हणून ओळखली जातात. 3 / 6जपानमध्ये या द्राक्षांना रुबी रोमन नावाने ओळखतात. ही द्राक्षे गोड आणि रसरशीत असतात. पण, थोडी एसिडिक सुद्धा आहेत. 4 / 6लग्झरी फळांच्या यादीत रुबी रोमन समावेश आहे. त्यामुळे विशेषकरुन शुभ कार्यासाठी किंवा बिझिनेस प्रमोशनदरम्यान गिफ्ट दिली जातात. 5 / 6लिलाव करणाऱ्या एका अधिकाऱ्यांने सांगितले की, बाजारात या रूबी रोमन द्राक्षांची मागणी मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे या द्राक्षांना मोठी किंमत आहे.6 / 6कनाजावा बाजारात या द्राक्षावर रिकॉर्ड ब्रेक बोली लावण्यात आली. 24 लाल द्राक्षांचा हा गुच्छ 'ह्याकुराकुसो' नावाच्या एका कंपनीने खरेदी केला आहे, असेही त्यांनी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications