Businessman matthew moulding gives share of profits to employees become millionaires
१ नंबर, बॉस असावा तर असा! कर्मचार्यांना दिले कंपनीचे शेअर्स, सगळ्यांना करोडपती बनवलं ना राव By manali.bagul | Published: November 26, 2020 7:52 PM1 / 8बॉसने आपल्या कंपनीच्या फायद्यासह कामगारांच्या फायद्याचाही विचार करायला हवा, असं अनेकांना वाटतं.ब्रिटनच्या एका व्यावसाईकाने आपल्या कंपनीचे नफ्यात असलेले शेअर कर्मचार्यांमध्ये वाटून टाकले आहेत. यामुळे कंपनीतील जास्तीत जास्त कर्मचारी करोडपती बनले आहेत. जेव्हा कंपनीचे शेअर्स वेगाने वाढत गेले तेव्हा कंपनीने खूप नफा कमावला. त्यावेळी व्यावसायिकाने हे केले.2 / 8'द हट ग्रुप' असे या कंपनीचे नाव आहे. मॅथ्यू मोल्डिंगची हे कंपनीच्या मालक असून मॅथ्यू यांनी आपल्या कंपनीच्या नफ्यातून आपल्या कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये सुमारे 8183 कोटी रुपयांचे शेअर्स वितरित केले. त्यांनी बँकेद्वारे ही योजना चालविली. सर्व कर्मचार्यांसाठी ही एक खुली योजना होती.3 / 8या योजनेचा लाभ अशा कर्मचार्यांना झाला ज्यांनी कधी विचार नव्हता. कर्मचार्यांची निवड करून त्यांच्या व्यवस्थापकांनी ती यादी मॅथ्यू यांना दिली. 4 / 8मिरर या ब्रिटिश वृत्तपत्राशी बोलताना मॅथ्यू मोल्डिंग म्हणाले की, '' प्रत्येकाचा स्वतःचा आणि कंपनीचा फायदा व्हावा अशी माझी इच्छा होती. प्रत्येकाला बरीच रक्कम मिळाली आहे. यावेळी, बरेच लोक या व्यापाराच्या विरोधात काहीतरी बोलत होते, परंतु मला विश्वास आहे की शेअर वाढेल. कोणीही परिपूर्ण नाही, परंतु आपल्या सर्वांना नक्कीच नफा आणि पैशामध्ये वाटा हवा आहे.''5 / 8द हट ग्रुप एक ई-कॉमर्स बिजनेस आहे. मॅथ्यू मोल्डिंग जिमिंगचे शौकिन असून त्यांना फिट राहायला खूप आवडतं. खासकरून त्याचा ब्रँड प्रोटिन्स शेक आणि सौंदर्य उत्पादनांसाठी प्रसिध्द आहेत. मॅथ्यू यांना अनेक व्यावसाईक पुरस्कार मिळाले आहेत. जगभरातील अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचा परिचय आहे. 6 / 8मॅथ्यू मोल्डिंग यांनी जॉन गॅलमोर यांच्यासमवेत 2004 मध्ये द हट ग्रुपची स्थापना केली. 48 वर्षीय मॅथ्यू गेल्या 16 वर्षांपासून बरेच पैसे कमवत आहे. त्याचा व्यवसाय खूप चांगला चालू आहे. असा अंदाज आहे की त्यांनी त्यांच्या शेअरहोल्डर्सना 1.1 अब्ज डॉलर्स बोनस दिला आहे.7 / 8हट ग्रुप जगातील 164 देशांमध्ये कार्यरत आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये फोर्ब्सने मॅथ्यू मोल्डिंग यांना प्रथमच अब्जाधीशांच्या यादीत स्थान दिले आहे. 8 / 8कंपनीच्या सुमारे 200 कर्मचार्यांना शेअर योजनेचा थेट फायदा झाला असून ते करोपडती झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications