china floating village known as gypsies of the sea interesting story behind village
तुम्ही तरंगत गावं पाहिलंय का? 'या' ठिकाणी आहे हे समुद्रात तरंगणार गाव, कारण वाचून बसेल धक्का! By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 4:48 PM1 / 11जगात असे एक गाव आहे जे समुद्रामध्ये तरंगत आहे. आज आम्ही तुम्हाला या विचित्र गावाविषयी सांगणार आहोत. 2 / 11हे गाव आपण चीनमध्ये आहे. हे गाव पाण्यावर तरंगत आहे. चीनच्या निंगडे शहरात हे गाव आहे.3 / 11या गावाच सुमारे ७ हजार मच्छिमार राहतात. त्यांच्या प्रजातीला टंका या नावाने ओळखले जाते. टंकांना ‘जिप्सी ऑन द सी’ म्हणून देखील ओळखले जाते.4 / 11 सागरी मच्छिमारांचे गाव दक्षिणपूर्व चीनमधील फुजियान प्रांतातील निंग्डे (Ningde) शहराजवळ आहे.5 / 11चीनचे हे गाव १३०० वर्ष जुने आहे आणि या गावात सुमारे ८ हजार ५०० लोक राहतात.6 / 11टंका लोकांचे जीवन हे मासेमारीवर आवलंबून असल्यामुळे पाण्यातच तरंगणारे घरे तयार केली आहेत. यात त्यांनी लाकडांचे मोठे प्लॅटफॉर्मही बनवले आहेत. त्यांच्या प्रत्येत पीढीला ही कला शिकवली जाते.7 / 11या गावाची कथा मोठी रंजक आहे. शेकडो वर्षांपूर्वी टांका समुद्रातील लोक तिथल्या शासकांकडून होणार्या शोषणामुळे एवढे नाराज झाले होते की, त्यांनी समुद्रावरच राहण्याचा निर्णय घेतला.8 / 11चीनमध्ये इ. स. ७00मध्ये तांग राजांची सत्ता होती. त्या काळी टांका समुदायाचाचे लोक युद्धापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी होड्यांमध्ये राहू लागले. तेव्हापासून त्यांना ‘जिप्सीज ऑन द सी’ असे म्हटले जाऊ लागले. 9 / 11हे लोक क्वचितच जमिनीवर येतात.आताही ते ना जमिनीवर येण्यास तयार आहेत, ना आधुनिक जीवनशैली स्वीकारण्यास.10 / 11जमिनीवर जाण्याची गरज भासू नये यासाठी त्यांनी तरंगती घरेच नाही तर लाकडांच्या मदतीने छोटी छोटी तरंगती शेतेही बनवून घेतली आहेत. त्यात ते अन्नधान्य व अन्य भाजीपाला पिकवतात.11 / 11चीन सरकार 'टंका' जमातील मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या गावक-यांना पाण्यात राहण्यात आनंद वाटतो. आणखी वाचा Subscribe to Notifications