चीनमध्ये आहे जगातली सर्वात वेगवान ट्रेन, वेग पाहुन थक्क व्हाल...अक्षरश: हवेत तरंगते
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 18:29 IST
1 / 11पृथ्वीवर जर कोणते वेगवान वाहन (World's Fastest Train) असेल तर ते चीनची मॅग्लेव्ह ट्रेन आहे, असे काहींचे मत आहे. 2 / 11२० जुलै २०२१ रोजी चीनच्या किनारपट्टीवरील शिंगॉन्ग प्रांताच्या किंगदाओ येथे सार्वजनिकपणे हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेनची सेवा सुरू करण्यात आली.3 / 11चिनी मीडियाच्या वृत्तानुसार, ही ६०० किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. मॅगलेव्ह ट्रेन धावताना रुळावर थोडीशी तरंगताना दिसते4 / 11मॅग्लेव्ह ट्रेनला १० डबे जोडले जाऊ शकतात. या प्रत्येक कोचमध्ये १०० प्रवाशांची क्षमता असते.5 / 11ही ट्रेन विद्युत चुंबकीय शक्तीच्या (Electro Magnetic Force) मदतीने रुळाच्या वर तरंगताना दिसते. या ट्रेनला 'फ्लोटिंग ट्रेन' असेही म्हटले जाते.6 / 11या ट्रेनचा प्रोटोटाइप २०१९ मध्ये बनवण्यात आला होता. त्याची यशस्वी चाचणी जून, २०२० मध्ये झाली. 7 / 11या ट्रेनचा वेग ताशी 600 किलोमीटर आहे. त्यानुसार शांघाई ते बीजिंगपर्यंत जाण्यास अडीच तास लागतील. शांघाई ते बीजिंगचे अंतर एक हजार किलोमीटरहून अधिक आहे. त्या तुलनेत, विमानाने या प्रवासासाठी ३ तास आणि हाय स्पीड रेल्वेने साडेपाच तास लागतील. 8 / 11चीनच्या किनारपट्टीवरील शहर किंगदाओ येथे ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. मॅगलेव्ह ट्रेन चीनने स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केल्याचा दावा केलाय.9 / 11शांघाईमध्ये मॅगलेव्ह ट्रेनसाठी छोटी लाईन आहे, जी शहरातून मुख्य विमानतळावर जाते.10 / 11चीनकडे अद्याप आंतरराज्य किंवा आंतरराज्यीय मॅगलेव्ह लाईन तयार केलेली नाही. शांघाई आणि चेंग्दू यासारख्या चीनच्या काही शहरांमध्ये या मार्गासाठी संशोधन सुरु आहे.11 / 11जपान आणि जर्मनीसारखे देशही येथे मॅगलेव्ह ट्रेन चालवण्याचा विचार करत आहेत. मात्र या ट्रेनचे नेटवर्क तयार करण्यासाठी खूप खर्च आहे, म्हणून बर्याच देशांनी ही कल्पना सोडली आहे.