शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता! चीनमध्ये मुलांना कोंबड्याच्या रक्ताचं इंजेक्शन टोचत आहेत लोक, जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 5:19 PM

1 / 6
जगभरात चीनमधील लोक आपल्या विचित्र खाण्या-पिण्यासाठी ओळखले जातात. असं म्हटलं जातं की, चीनमधील लोक काहीही खाऊ शकतात. आता चीनमधून एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्याची चर्चा जगभरात होत आहे. येथील लोक लहान मुलांना कोंबड्याच्या रक्ताचं इंजेक्शन टोचत आहेत. चला जाणून घेऊ चीनमध्ये लोक असं का करत आहेत.
2 / 6
चीनमध्ये लोक मुलांना कोंबड्यांच्या रक्ताचं इंजेक्शन टोचत आहेत. कारण लहान मुलांची आरोग्यासंबंधी समस्या दूर व्हाव्यात. चीनमध्ये आई-वडील आपल्या मुलांना सुपर किड बनवण्यासाठी हे अजब काम करत आहेत. चीनमध्ये हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
3 / 6
एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, चीनमध्ये आई-वडील लहान मुलांचं शरीर स्फुर्तीदायक बनवण्यासाठी कोंबड्याच्या रक्ताचं इंजेक्शन लावत आहेत. त्यासोबतच असाही दावा केला गेला आहे की, याने मुलांच्या आरोग्यासंबंधी समस्या दूर होतात.
4 / 6
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, हे इंजेक्शन लावल्यानंतर कॅन्सर आणि टक्कल पडण्याची समस्या दूर होऊ शकते. त्यासोबत असंही सांगितलं जात आहे की, कोंबड्यांच्या रक्तात स्टेरॉयड आढळतं. ज्यामुळे मुले अभ्यास आणि खेळण्यात वेगवान होतात. चीनमध्ये मुलांना कोंबड्यांच्या रक्ताचं इंजेक्शन लावण्यासाठी गर्दी जमली आहे. जेणेकरून त्यांची मुले सुपर किड व्हावी.
5 / 6
याच कारणामुळे चीनमध्ये चिकन बेबीची क्रेझही वाढत आहे. लोकांना बघून दुसरे आई-वडिलही असंच करत आहेत. जेणेकरून त्यांचंही मुल पुढे जावं. चपळ, हुशार व्हावं.
6 / 6
एका रिपोर्टनुसार चीनमधील लहान मुलांचे डोळे कमजोर असतात. मीडिल स्कूलच्या दरम्यान ७१ टक्के आणि हाय स्कूल दरम्यान ८१ टक्के मुलांची नजर कमजोर असते.
टॅग्स :chinaचीनHealthआरोग्यJara hatkeजरा हटके