Christmas 2018 : Secret santa budget gift ideas
Christmas 2018: ख्रिसमसला मित्रांना द्या हे स्वस्तात मस्त गिफ्ट! By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 3:59 PM1 / 10ख्रिसमसला वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये सीक्रेट सांताचं आयोजन केलं जातं. यात एकमेकांना गिफ्ट दिले जातात. पण कुणी कुणाला काय दिलं हे गुपित ठेवलं जातं. हे करायला तर भारी वाटतं पण अडचण तेव्हा येते जेव्हा गिफ्ट खरेदी करायचं असतं. वेळेवर नेमकं काय गिफ्ट घ्यावं असा यक्षप्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. मग सुरु होते वेबसाइट्स आणि मॉल्सची भटकंती. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी गिफ्टचे काही खास पर्याय घेऊन आलो आहोत. याने तुमचं काम सोपं होईल. (Image Credit : blog.bedbathandbeyond.com)2 / 10१) फार काही तुम्हाला कळत नसेल किंवा फारच वैतागले असाल तर सोप्यात सोपं म्हणजे तुम्ही मित्राला गिफ्ट म्हणून चॉकलेट देऊ शकता. अलिकडे बाजारात वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि क्वालिटीचे स्वस्त आणि महागडी अशी दोन्ही चॉकलेट उपलब्ध आहेत. हेही तुमच्या मित्राला नक्की आवडेल.3 / 10२) तुम्हाला जर एखाद्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही छोट्या बॅग्सही देऊ शकता. या केवळ तशा रिकाम्या न देता त्यात चॉकलेट किंवा आणखीही त्यांना आवडेल असं काही टाकू शकता. याचा मुलींना वेगवेगळा फायदा होऊ शकतो. तसेच याने स्टाइलही होते.4 / 10३) मुलीला गिफ्ट द्यायचं असेल तर आणखी एक चांगला पर्याय म्हणजे टेडी बेअरही देऊ शकता. मुलींना हे तुमचं गिफ्ट नक्की आवडणार यावर विश्वास ठेवा. टेडी ५०० रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यंत बाजारात सहज मिळू शकतात. याची तुम्ही ऑनलाइनही खरेदी करु शकता. 5 / 10४) मित्राला काय द्यावं असा विचार पडला असेल तर तुम्ही त्यांना शेविंग किट किंवा ट्रिमर गिफ्ट करु शकता. ही वस्तू सहज कुठेही आणि स्वस्तात मिळू शकते. 6 / 10५) तुमच्या मित्राकडे कोणता मोबाईल आहे हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही त्याला कस्टमाइज फोन कवरही गिफ्ट देऊ शकता. तुमच्या मित्राच्या आवडी-निवडी माहिती असेल तर तुम्ही त्यानुसार कवर तयार करुन घेऊ शकता.7 / 10६) जर तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला वाचण्याची आवड असेल तर त्यांना त्यांचं आवडीचं एखादं पुस्तकही तुम्ही गिफ्ट करु शकता. त्यांना तुम्ही पुस्तक ऑनलाइन गिफ्ट करुनही पाठवू शकता. (Image Credit : metro.co.uk)8 / 10७) खरंतर गिफ्ट कुणाला द्यायचं आहे हेही फार महत्त्वाचं असतं. समोरची व्यक्ती जर फार ओळखीची नसेल तर तुम्ही त्यांना एखादा बुकेही भेट देऊ शकता. स्वस्तात तुम्हाला चांगले बुके मिळतील. (Image Credit : www.giftcarry.com)9 / 10८) मेकअप किट हा मुलींना गिफ्ट देण्याचा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. कारण मुली कधीही मेकअपला नाही म्हणत नाहीत. बरं पूर्ण मेकअप किट द्यायचं नसेल तर लिपस्टीकही गिफ्ट देऊ शकता.10 / 10९) ऑफिसमधील मित्र असेल तर त्याला डेस्कवर ठेवण्यासाठी काही आकर्षक वस्तू गिफ्ट करु शकता. अलिकडे बाजारात डेस्क डेकोरेशनच्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फार महागही नसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications